आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रॉडबँड परवाने जिल्हास्तरावर मिळणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील ब्रॉडबँडला चालना मिळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून ब्रॉडबँडचे परवाने जिल्हा स्तरावर जारी करण्याची केंद्राची योजना आहे. या अंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांसाठी परवान्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार आहेत.

दूरसंचार विभागातील (डॉट) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सर्व सेवांसाठी नवे टेलिकॉम धोरण-2012 नुसार युनिफाइड लायसन्ससंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होणार आहेत. ग्रामीण दूरसंचार तसेच ब्रॉडबँडसंबंधी नेमण्यात आलेल्या समितीची नुकतीच बैठक झाली. तीत ब्रॉडबँड सेवांना चालना मिळण्यासाठी जिल्हा स्तरावर परवाने देण्याबाबत चर्चा झाली. सूत्रांनी सांगितले, जिल्हा सत्रावर ब्रॉडबँड सेवांसाटी आयएसपी सी श्रेणीचा परवाना होता. नव्या धोरणात तोरद्द करण्यात आला. ब्रॉडबँडच्या विस्तारासाठी जिल्हा स्तरावर परवाने देणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन लवकरच त्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील आणि जिल्हा स्तरावर इंटरनेट सेवांसाठीच्या परवान्याबाबत नियमावली जाहीर होईल. परवान्याव्यतिरिक्त सर्व्हिस ऑपरेटरना फ्रँचायझी देण्याबाबतही विचार सुरू आहे. जी कंपनी इंटरनेट सेवा पुरवते त्या कंपनीला जिल्हास्तरीय फ्रँचायझी देण्याची मुभा मिळेल.

ग्रामीण उद्योगाला चालना
जिल्हा स्तरावर ब्रॉडबँड सेवांसाठी परवाने दिले तर ग्रामपंचायत तसेच गाव पातळीवर उद्योगांना चालना मिळेल, असे दूरसंचार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कंपन्या गावाकडे येतील, तेथे नेटवर्क स्थापन करतील. नेटवर्क चालवण्यासाठी स्थानिक तरुणांना प्रेरित करतील. त्यामुळे ग्रामीण उद्योगाला मोठी चालना मिळेल.