आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिव्हिडंड यिल्ड स्टॉक्स : लाभांश पूर्णपणे करमुक्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले पैसे बचत खात्यात ठेवले तर त्यावर 4 टक्के ते 6 टक्के व्याज मिळते. तेच जर मुदत ठेवीत ठेवले तर 9 टक्के व्याज मिळते. पण या मिळालेल्या व्याजावर आयकर द्यावा लागतो. म्हणजे ज्यांना 30 टक्के दराने आयकर द्यावा लागतो त्यांना प्रत्यक्षात केवळ 6 टक्केच व्याज मिळते. असे लोक व इतरही काही जण डिव्हिडंड यिल्ड स्टॉक्स खरेदी करण्याचा विचार करतात. कारण शेअर्सवर मिळणारा डिव्हिडंड म्हणजे लाभांश पूर्णपणे करमुक्त असतो. पण फक्त किती डिव्हिडंड मिळाला ते विचारात घेऊन चालणार नाही तर डिव्हिडंड यिल्ड लक्षात घ्यावे लागते. म्हणून डिव्हिडंड यिल्ड म्हणजे काय ते आज बघू.


कॅपिटल अप्रिसिएशनचाही लाभ
कंपनीला नफा होतो तेव्हा नफ्याचा काही भाग कंपनी पुढील व्यवसाय विस्तारासाठी रिझर्व्हमध्ये ठेवते व इतर रकमेचे शेअरधारकांना डिव्हिडंडच्या रूपात वाटप करते. नफ्यापैकी किती रक्कम रिझर्व्हमध्ये ठेवायची व किती रकमेचे डिव्हिडंडच्या रूपात वाटप करायचे हे कंपनीच ठरवते. तसेच मुदत ठेवीबरोबर तुलना करायची तर मुदत ठेवीवर निश्चित दराने ठरलेल्या मुदतीसाठी व्याज मिळेल याची हमी असते तसेच मुदतीअंती आपली मुद्दल परत मिळेल याचीही हमी असते. शेअर्सवर डिव्हिडंड मिळेलच याची हमी नसते तसेच तो किती मिळेल याचीही हमी नसते आणि ज्या भावात आपण शेअर्स खरेदी केलेले आहेत त्यापेक्षा भाव खाली गेला तर ते विकल्यानंतर आपल्या हातात मूळ रकमेपेक्षा कमी रक्कम येईल. पण भाव वाढला तर कॅपिटल अप्रिसिएशनचाही लाभ मिळेल.


काही कंपन्याच देतात चांगला डिव्हिडंड
बहुतेक कंपन्यांना पुढील व्यवसाय विस्तारासाठी पैसा-भांडवल हवे असते. त्यामुळे त्या सढळपणे डिव्हिडंड देत नाहीत. काही कंपन्याच चांगला डिव्हिडंड देतात. यात काही बहुराष्‍ट्रीय कंपन्या आहेत. कारण त्यांना परदेशातील आपल्या पॅरेंट कंपनीला डिव्हिडंडच्या रूपाने पैसा द्यायचा असतो. पण यांच्या शेअरचे भावही जास्त असतात. तसेच काही सरकारी कंपन्याही चांगला डिव्हिडंड देतात आणि मार्केटमध्ये यांच्या शेअरचे भाव कमी असल्यामुळे टक्केवारीच्या हिशेबात त्यांनी दिलेल्या डिव्हिडंडचे प्रमाण म्हणजे डिव्हिडंड यिल्ड जास्त वाटते. हे डिव्हिडंड यिल्ड म्हणजे काय ते बघू.


स्टेट बँक ऑफ इंडियाने 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या त्यांच्या शेअरवर प्रतिशेअर 41.50 रुपये असा डिव्हिडंड दिला आहे. हा 14 मे 2013 ला जाहीर करण्यात आला. त्या वेळेस या शेअरचा भाव होता सुमारे 2380 रुपये. म्हणजे 2380 रुपये देऊन आपण एक शेअर घेतला असता तर त्यावर आपल्याला 41.50 रुपये असा डिव्हिडंड मिळाला असता.


14 मे 13 नंतर मार्केट खाली आले व विशेषत: बँकिंग सेक्टरला त्याचा जास्त फटका बसला. त्यामुळे स्टेट बँकेच्या शेअरचा भाव 2380 वरून आता 9 ऑगस्ट 13 ला 1661 रुपये झाला आहे. म्हणजेच तिथेही आपले नुकसान झाले. उलट खाली आलेल्या भावात हा शेअर घेतला व पुढील वर्षी इतकाच डिव्हिडंड बँकेने दिला तर डिव्हिडंड यिल्ड होईल 2.50. मात्र याची हमी नाही.


बिर्ला डिव्हिडंड यिल्ड प्लस, यूटीआय डिव्हिडंड यिल्ड व इतर योजना
याउलट जीआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीने 5 रुपये डिव्हिडंड 10 मे 2013 ला जाहीर केला. कंपनी पुढील वर्षीही इतकाच डिव्हिडंड देईल असे गृहीत धरले व 9 ऑगस्ट 13 ला तो खरेदी केला असता तर त्या दिवशी त्याचा भाव होता 88 रुपये. म्हणजे 88 रुपयावर आपल्याला 5 रुपये डिव्हिडंड मिळेल अशी शक्यता आहे. म्हणून डिव्हिडंड यिल्ड होते 5.68 रुपये. डिव्हिडंड यिल्डच्या हिशेबात हा चांगला समजला जातो. तसेच असे शेअर निवडताना कंपनी फंडामेंटली चांगली आहे, ती सातत्याने दरवर्षी डिव्हिडंड देत आहे, तिचा भाव वाढत राहील यासाठी वाव आहे असेच शेअर घ्यावेत. हे डिव्हिडंड कंपन्या दरवर्षी साधारण मेमध्ये जाहीर करतात. हा अंतिम डिव्हिडंड असतो. क्वचित काही कंपन्या इंटेरिम डिव्हिडंडही वर्षाच्या मध्येच कधी जाहीर करतात. आपल्याला थेट असे शेअर कोणते ते कठीण वाटते असेल तर काही म्युचुअल फंडांच्या अशा डिव्हिडंड यिल्ड स्टॉकमध्ये गुंतवणूक करणा-या योजना आहेत. उदा : बिर्ला डिव्हिडंड यिल्ड प्लस, यूटीआय डिव्हिडंड यिल्ड इत्यादी. त्याचाही विचार करू शकतो.


kuluday@rediffmail.com