आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Special: Oil, Sabudana Price Down, Grocery Budget Cheap

दिव्य मराठी विशेष: तेल, साबुदाणा घसरला; किराणा बजेट स्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक तारीख आली की महिन्याचा किराणा भरण्याचे एक मोठे काम सर्वांनाच करावे लागते. किराणा साहित्याची खरेदी टाळता न येणारी आहे. किराणा साहित्याच्या भावात महिनाभरात किती चढ-उतार झाला याचा आलेख वाचकांच्या माहितीसाठी प्रत्येक महिन्याला आम्ही प्रकाशित करणार आहोत. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी करणे आणि त्याचे बजेट आखणे आणखी सोपे होणार आहे. गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाच्या व यजमानाच्या खिशाशी निगडित असणा-या या विषयावरील दै. ‘दिव्य मराठी’चा हा विशेष वृत्तांत...
नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत बहुतेक किराणा मालाच्या किमती स्थिर राहिल्या. साखर आणि तेलाच्या भावात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचा तोरा मात्र नोव्हेंबरमध्ये कमी झाला असून उत्तर भारतात भाववाढीने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा स्थानिक बाजारात दर्जानुसार 20 ते 30 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. दसरा, दिवाळी असा सणाचा हंगाम संपलेल्या बाजाराला आता लग्नसराई आणि संक्रांतीचे वेध लागले आहेत. साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या किमती चांगल्याच उतरल्याने उपवास करणा-या मंडळीला दिलासा मिळाला आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गणेशोत्सव आणि गौरीपूजन हे महत्त्वाचे सण होते. त्यामुळे बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या होत्या. नंतर दिवाळीमुळे बाजारात सप्टेंबरच्या तुलनेत जास्त गर्दी होती. आता बाजारातील गर्दी ओसरली असली तरी लग्नसराईच्या किराणा खरेदीची गडबड सुरू आहे. किराणा साहित्यात शेंगदाणा तेलाच्या किमती किलोमागे 10 ते 20 रुपयांनी उतरल्या, तर सोयाबीन तेलाच्या किमती किलोमागे 6 ते 8 रुपयांनी कमी झाल्या आहेत. ज्वारी व बाजरीचे भाव स्थिर असले तरी गव्हाचा तोरा कायम आहे. तांदूळ दोन महिन्यांपासून स्थिर आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबरचा किराणा भरताना खिशावर जास्त भार पडणार नाही.
नोव्हेंबर महिन्यातील किराणा व भाजीपाल्याच्या दरातील चढ-उतार
किराणा : विविध वस्तूंचे भाव
वस्तू 01 डिसें. 01 नोव्हे. फरक
साखर 31 रु 32 रु. स्थिर
तांदूळ एचएमटी 54 रु. 54 रु. स्थिर
तांदूळ चिनोर 40 रु. 40 रु. स्थिर
शेंगदाणे 78 रु. 80 रु. 02 रु. घट
साबुदाणा 75 रु. 80 रु. 05 रु. घट
तूर डाळ 74 रु. 74 रु. स्थिर
हरभरा डाळ 46 रु. 48 रु. 02 रु. घट
मूग डाळ 85 रु. 85 रु. स्थिर
सोयाबीन तेल 76 रु. 82 रु. 06 रु. घट
शेंगदाणा तेल 110 रु. 120 रु. 10 रु. घट
गूळ 45 रु. 45 रु. स्थिर
ज्वारी 18 रु. 18 रु. स्थिर
गहू 24 रु. 25 रु. 01 रु. घट
बाजरी 18 रु. 17 रु. 01 रु. घट
रवा 28 रु. 25 रु. 03 रु. वाढ
पोहे 38 रु. 40 रु. 02 रु. घट
चहा (पाव किलो) 78 रु. 78 रु. स्थिर
एकूण 918 रु. 943 रु.
(सर्व भाव रुपये प्रतिकिलोचे किरकोळ बाजारातील आहेत )
भाजीपाला : टोमॅटो, कारले तेजीत
वस्तू 01 डिसें. 01 नोव्हे. फरक
कांदा 20 ते 25 रु 30 रु. 05 रु. घट
बटाटा 25 रु. 20 रु. 05 रु. वाढ भेंडी 45 रु. 40 रु. 05 रु. वाढ
वांगी 30 ते 40 रु. 30 रु. वाढ
कारले 50रु. 40 रु. 10 रु. वाढ
टोमॅटो 40 रु. 40 रु. स्थिर
दोडका 40 रु. 40 रु. स्थिर
गवार 50 रु. 40 रु. 10 रु. वाढ
मेथी (जुडी) 5 रु. 5 रु. स्थिर
पालक (जुडी) 5 रु. 5 रु. स्थिर कोथिंबीर (जुडी)5 रु. 5 रु. स्थिर
(सर्व भाव किरकोळ बाजारातील प्रतिकिलोचे आहेत.)