आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मोबाइल, आधार क्रमांकाने होणार शॉपिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खरेदीसाठी आता क्रेडिट तसेच डेबिट कार्ड ठेवण्याची गरज लागणार नाही. पैसे पाठवण्यासाठी केवळ आधार आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक ठरणार आहे. नॅशनल पेमंेट काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (एनपीसीआयएल) नवी पेमेंट प्रणाली अमलात आणण्याची तयारी सुरू केली आहे. यात पैसे हस्तांतरणासाठी मोबाइल क्रमांकाचा वापर केला जाईल. ग्राहकाला आपल्या मोबाइलवर पैसे ज्यास द्यायचे आहेत त्याचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा रुपे कार्ड क्रमांक फीड करावा लागेल. एनपीसीआयएल २०१५ च्या पहिल्या सहामाहीत या प्रणालीचा पायलट प्रकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे.
एनपीसीआयएलने नुकतेच यासंदर्भात एकीकृत पेमेंटसाठीचा एक मसुदा जारी केला आहे. त्यात एक सुटसुटीत व सोपी पेमेंट पद्धती विकसित करण्याचे सुचवण्यात आले आहे. त्यात त्रुटी राहू नयेत म्हणून सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्या सूचनांनुसार ही पूर्ण प्रणाली तयार करण्यात येणार आहे.

पुढे वाचा, एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर