आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉलरची विक्री, वाढता भांडवलाचा ओघाने रुपयाला पुन्हा तरतरीपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेअर बाजारातील तेजी, निर्यातदारांकडून झालेली डॉलरची विक्री आणि भांडवलाचा वाढता ओघ यामुळे गुरुवारी रुपयाला पुन्हा तरतरी आली. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 54 पैशांची कमाई करत 61.39 पर्यंत मजल मारली. हा दोन महिन्यांचा उच्चांक आहे. सकाळच्या सत्रात रुपया 62.20 पर्यंत घसरला होता. त्यानंतर देशातील प्रमुख बँकांनी डॉलरची विक्री केल्याने रुपयाला बळकटी आली. इंडिया फॉरेक्स अँडव्हायझर्सचे सीईओ अभिषेक गोयंका यांनी सांगितले की, सकाळच्या सत्रात डॉलरला मागणी होती. नंतर मात्र रुपयाला चांगली मागणी आल्याने दोन महिन्यांचा उच्चांक गाठता आला.

सेन्सेक्स वाढीसह बंद
कंपन्यांच्या तिमाही निकालाचा हंगाम शुक्रवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे चित्र गुरुवारी दिसले. चढ-उताराच्या हिंदोळ्यात दिवसअखेर बाजारात तेजीचे पारडे झड झाले. सेन्सेक्स 23.65 अंकांच्या वाढीसह 20,272.91 वर बंद झाला. निफ्टीने 13.50 अंकांच्या कमाईसह 6020.95 ही पातळी गाठली. ऑटो, मेटल आणि आयटी निर्देशांकात चांगली वाढ दिसून आली. बाजारातील 13 पैकी 10 क्षेत्रीय निर्देशांक वधारले. टाटा मोटर्स, एचडीएफसी आणि इन्फोसिस या समभागांनी बाजारातील तेजीला बळ दिले, तर एचडीएफसी बँक, आयटीसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या समभागातील घसरणीने तेजीत खोडा घातला.