आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक मार्गावरून ढळू नका!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


निवेशसंच भरकटलेला आहे? काही सोपी पावलं उचलून त्याला पुन्हा रुळावर आणता येईल. भारतातल्या मुच्युअल फंड गुंतवणूकदारांना रोलर कोस्टर राईडचा अनुभव येतोय. म्हणूनच प्रत्येक गुंतवणूकदारांच्या निवेशसंचासाठी योग्य ठरण्याची क्षमता असूनही मुच्युअल फंड हा आता गुंतवणुकीचा पहिल्या पसंतीचा पर्याय नसावा, यात काहीच आश्चर्य नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकदारांचा सहभाग वाढतो आहे, हे खरे असले तरी अपेक्षा आणि वास्तव यातील तफावत, चुकीची विक्री, समज कमी पडणे आणि उत्पादनांचा चुकीचा पवित्रा यामुळे या उद्योगक्षेत्राच्या वाढीला पुन:पुन्हा खीळ बसते आहे. शिवाय चुकीच्या गुंतवणूक धोरणव्यूहांमुळे गुंतवणूकदारांच्या त्रासात भर पडते आहे. जेव्हा गुंतवणूकदार चुकीची धोरणे अवलंबतात, तेव्हा त्यांच्या निवेशसंचांवर काय परिणाम होतो आणि तो कसा दुरुस्त करता येईल हे पाहू :

म्युच्युअल फंड : अनेक गुंतवणूकदारांना असे वाटते, की एखादा म्युच्युअल फंड निवेशसंच विविध विस्तारित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अनेक फंडांचा समावेश करणे होय. अतिविस्तारामुळे त्यांच्या निवेशसंचाला फटका बसतो. शिवाय एकमेकांसारखे अनेक फंड असल्यावर त्यांचा माग ठेवणेही कठीण होते. खरं तर काळजीपूर्वक निवडलेले काही निवडक फंडच चांगल्या पातळीतील विविध विस्तार पुरवतात आणि निवेशसंचाचे उत्पन्नही सुधारते.
फंडांची अमूक एक संख्या म्हणजे योग्य संख्या, असे काही नसले तरी पुरेसा विविध विस्तारित निवेशसंच असणे इष्ट असते आणि निवेशसंचाचे आकारमान, मालमत्ता नियतन अशासारख्या घटकांची भूमिका फंडांची संख्या ठरवण्यात महत्त्वाची असते.
मिड-कॅप फंड : इक्विटींमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार नेहमी अल्पकालीन कामगिरीवर विसंबून राहतात. या धोरणामुळे त्यांची जोखीम घेण्याची क्षमता ओलांडली जाते. कारण मिड-कॅप फंडांची कामगिरी चांगली असताना उच्च कामगिरी करणा-या फंडांमध्ये गुंतवणूक करण्याने मिड-कॅप फंडांकडे लक्षणीय राशी नियत होते. जरी मिड-कॅप फंडांमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता असली तरी त्यांच्यातील गुंतवणूक मर्यादित ठेवणे चांगले. कारण निवेशसंचातील जोखीम-मोबदला यांचे संतुलन राखले जायला हवे. निर्णयप्रक्रियेमध्ये भूतकालीन कामगिरी हा महत्त्वाचा घटक असतो हे नि:संशय, पण त्यावर खूप विसंबून राहणे धोकादायक ठरू शकते. गुंतवणूकदार अनेकदा आपल्या ऋण निवेशसंचाकडे दुर्लक्ष करतात, कारण ते सुरक्षित समजले जातात.
डेट फंडांमध्ये गुंतवणूक करणा-यांनी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, की बाँड्सच्या किमती व्याजदरांच्या व्यस्त प्रमाणात असतात. व्याजदर वाढले की बाँड्सच्या किमती कमी होतात आणि व्याजदर कमी झाले की बाँड्सच्या किमती वर जातात. व्याजदरांच्या चढ- उतारांचा ऋण निवेशसंचावर लक्षणीय प्रभाव पडत असल्याने त्यावर लक्ष ठेवणे आणि बदलत्या व्याजदरांनुसार त्यात समायोजन करणे आवश्यक असते आणि त्यातील लाभ सुरक्षित राखण्यासाठीही त्यांच्यावर देखरेख करावी लागते.
व्याजदरचित्रावर लक्ष ठेवणे आवश्यक : थोडक्यात सांगायचे तर पतजोखीम आणि मुदतजोखीम कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्याची गरज असते. डेट फंडांमध्ये मुख्य फरक पडतो तो निवेशसंचाच्या मुदतपूर्ती कालावधीमुळे. डेट फंडाच्या प्रत्येक संवर्गाची विभिन्न जोखीम रूपरेषा असते आणि त्याच्याशी संलग्न उत्पन्न देण्याची क्षमता असते. निवेशसंचाचा मुदतपूर्ती कालावधी जितका जास्त असतो, तितका व्याजदरातील बदलाचा त्यावर जास्त परिणाम होतो. हे उघड आहे, की डेट फंडात गुंतवणूक करणा-या गुंतवणूकदाराने येत्या व्याजदरचित्रावर लक्ष ठेवणे आणि काळजीपूर्वक वाटचाल करणे महत्त्वाचे आहे.
इक्विटी फंडात गुंतवणूक करणे हे चांगले धोरण : डिव्हिडंड मिळण्याच्या थोडे आधी इक्विटी फंडात गुंतवणूक करणे हे चांगले धोरण असल्याचा काही गुंतवणूकदारांचा समज आहे. प्रत्यक्षात वास्तव असे आहे, की लाभांश म्हणून त्यांना त्यांच्याच भांडवलाचा काही भाग मिळतो. शिवाय लाभांशाच्या आकर्षणाने त्यांचे गुंतवणूक निर्णय झाकोळून जातात आणि ज्यांच्यामध्ये गुंतवणूक करायला नको, अशा फंडांमध्ये ते गुंतवणूक करून बसतात. हे धोरण अवलंबणे कसे निरर्थक आहे, याचे हे उदाहरण पाहू. प्रथम, जर एखाद्या फंडाने 100% लाभांश जाहीर केला तर तो एनएव्हीवर दिला जात नाही, तर दर्शनी किमतीवर दिला जातो, जी बहुतेक बाबतीत रु. 10 असते. दुसरे म्हणजे, एकदा लाभांश दिला की फंडाची एनएव्ही लाभांश रकमेने कमी होते. उदाहरणार्थ, जर 100% लाभांश देणा-या फंडाची एनएव्ही रेकॉर्ड दिनांकाला रु.40 असेल तर लाभांश देऊन झाल्यावर ती रु.30 पर्यंत कमी होईल. म्हणूनच जरी रु.10,000च्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला रु.2,500 लाभांश मिळाला तरी गुंतवणुकीचे मूल्य रु. 7,500 पर्यंत खाली येते. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, की लाभांश म्हणजे म्युच्युअल फंडांनी आपला नफा युनिटधारकांना वाटण्याची प्रक्रिया आहे आणि जे फंडामध्ये लक्षणीय काळ आहेत त्यांनाच त्याचा वास्तविक लाभ होत असतो.

सी.ई.ओ. वाईजइन्व्हेस्ट अ‍ॅडवायजर्स प्रा. लि.
hrustagi@yahoo.com