आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करांत नव्हे, डिझेल दरात वाढ करा! वाहन निर्माता संघटना ‘सियाम’ची सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- डिझेल कारवर कर लावण्याऐवजी थेट डिझेलच्या दरांतच प्रतिलिटर एक रुपयाने वाढ करा, असा तोडगा वाहन निर्माता संघटना सियामने सरकारला सूचवला आहे. सियाम व जनरल मोटर्स या कंपनीने डिझेल कारवर पाच टक्के शुल्क लावण्याच्या सरकारच्या प्रस्तावास विरोधक केला आहे.
डिझेलच्या दरांत रुपयाने वाढ केल्यास अधिक महसूल मिळेल, अशी माहितीही या कंपन्यांनी दिली आहे. यातून पेट्रोल-डिझेल कारच्या मागणीतील वाढलेल्या फरकाचा मुद्दाही निकालात निघेल. जनरल मोटर्सचे व्ही. पी. कॉर्पाेरेट कम्युनिकेशन्स पी. बालेंद्रन यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले की, सर्व वाहन कंपन्यांनी डिझेलच्या दरांत हळूहळू वाढ आणि पेट्रोलच्या दरांत हळूहळू कपात करण्याची सूचना सरकारला केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. यामुळे देशात डिझेल कारची मागणी वाढून 85 टक्क्यांवर पोहोचली आहे. दुसरीकडे पेट्रोल कारची मागणी मात्र 15 टक्क्यांनी घटली आहे. सर्वसामान्यपणे मागणी ही 50-50 टक्के असावी.
असा होईल फायदा- पेट्रोल महाग असल्यामुळे अचानक डिझेल कारची मागणी भलतीच वाढली आहे. डिझेल दरवाढीमुळे पेट्रोल आणि डिझेल कारच्या मागणीत संतुलन साधले जाईल. वाहन उद्योगाच्या कामगिरीतही सुधारणा होईल.
असे आहे गणित- बालेंद्रन यांच्यानुसार डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर एक रुपयाने दरवाढ केल्यास सरकारला यातून 6000 कोटी रुपयांचा महसूल मिळेल. या उलट डिझेल कारवर 5 टक्के कर लावल्यास फक्त 2500 कोटींचाच महसूल मिळेल. दरवाढीने महसूलात तीन पटींनी वाढ होऊ शकेल.
बालेंद्रन यांचा तर्क- नियोजन आयोगाच्या एका अध्ययन अहवालात म्हटले आहे की, देशातील एकूण डिझेलच्या खपापैकी 1.03 टक्के हिस्सा खासगी कारद्वारे होते. यामुळे डिझेल वाहनांवर शुल्क लावणे वाहन उद्योगाच्या हिताचे नाही.