आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- दूरसंचार विभाग आता 'युनिनॉर'नंतर व्होडाफोन आणि लूप मोबाईलला दणका देण्याच्या तयारीत आहे. मुंबईत व्होडाफोन आणि लूप मोबाईलच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यास नकार दिला आहे. व्होडाफोनला मुंबईसह दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्येही फटका बसणार आहे. या प्रमुख शहरासाठीही व्होडाफोनच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यास सरकारने नकार दिला आहे. याशिवाय भारती एअरटेललाही अशाच प्रकारचे पत्र दूरसंचार विभागाकडून पाठविण्यात येणार आहे. या कंपन्यांचे परवाने 2014मध्ये संपुष्टात येणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून व्होडाफोन आणि सरकार यांच्यात सात हजार कोटींच्या करांच्या थकबाकीवरून वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयातही दोन्ही पक्ष आमने सामने आहेत. व्होडाफोनने करामध्ये सवलत द्यावी यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. त्यावर कॅबिनेटमध्ये निर्णय होईल असे अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे.
परवान्यांच्या नुतनीकरणास नकार दिल्यामुळे व्होडाफोनला आता मुंबई, दिल्ली आणि कोलकात्यासाठी नव्याने होणाऱ्या टूजी स्पेक्ट्रमच्या लिलावातूनच परवाना मिळावावा लागणार आहे. परवाना मिळाला नाही तर व्होडाफोनचे सेवा या सर्कलमध्ये बंद होईल. लूप मोबाईलची सेवा फक्त मुंबईत आहे. या कंपनीलाही नव्याने परवाना घ्यावा लागणार आहे. एअरटेलबाबतही हीच स्थिती आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.