आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची प्रगती अर्थसुरक्षेच्या दिशेने; डॉ. विजय केळकर यांचा विश्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आणि सर्वच क्षेत्रामध्ये, मोठय़ा प्रमाणावर मंथन सुरू असून लवकरच भारताची अर्थव्यवस्था भरारी घेईल. त्यामध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा सहभाग असेल आणि आपण अर्थसुरक्षेकडे प्रवास करू, असा विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांनी व्यक्त केला. ‘इन्फम्रेशन सिस्टिम्स ऑडिट अँँड कंट्रोल असोसिएशन’च्या (आयएसएसीए)पुणे चॅप्टरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘2014 आयटीएसएनेबिं्लग द डिजिटल वल्र्ड’ या माहिती सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

भारताच्या विकासाची कथा ही स्वातंत्र्यानंतर 1990 पर्यंत आणि 1990 नंतर अशी दोन भागांमध्ये विभागली आहे. देशाच्या विकासदरामध्ये प्रत्येक दशकामध्ये वाढ होत गेली. हा दर 1.29 टक्के, 1.34 टक्के, 3.07 टक्के, 4.25 टक्के असा वाढत गेला मात्र, 1990 नंतरच्या दशकामध्ये तो एकदम 6.5 टक्के आणि 2008 पर्यंत हा दर 8 टक्क्यांपर्यंत गेला. धोरणांमधील त्रुटी, अनुदानामध्ये मोठय़ा प्रमाणावर झालेली वाढ, व्याज दरांमधील वाढ यामुळे वित्तीय तूट वाढत गेली आणि जगामध्ये आलेल्या आíथक मंदीमुळे, 2008 मध्ये विकासाचा हा वेग मंदावला आणि तो 4.5 टक्क्यांवर थांबला असल्याचे डॉ. केळकर यांनी सांगितले.

आयएसएसीएच्या पुणे चॅप्टरचे अध्यक्ष संदीप गोडबोले, रिझर्व्ह बँकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. के. हिरवे, रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक जी. गोपालकृष्णन व्हिडिओ कॉन्फरनिंसगद्वारे परिषदेला उपस्थित होते.

माहिती सुरक्षेविषयी जनजागृती आवश्यक
इंटरनेट, मोबाइल बँकिंग व्यवहाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. परंतु त्याचबरोबर माहितीची चोरी, इंटरनेटवरून होणारी फसवणुकीचे प्रकारही वाढत आहे. फिशिंग फ्रॉड, नायजेरियन फ्रॉड वाढताना दिसतात. यासाठी बँकांनी जास्त काळजी घ्यायला हवी. बँकांनी यासाठी ग्राहकांचे शिक्षण करणे गरजेचे असून माहिती सुरक्षेविषयी जागृती करणे गरजेचे असल्याचे मत गोपालकृष्णन यांनी या वेळी व्यक्त केले.