आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘डीटीएच’ची बाजारपेठ जाणार 5 अब्ज डॉलरवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सेट टॉप बॉक्स न बसवल्यास तुमच्या टीव्हीचा सिग्नल जाऊन तो बंद पडू शकतो ही जाहिरात सध्या सारखी दाखवली जात आहे. सेट टॉप बसवण्यासाठी ग्राहकांना 31 मार्चची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे सेट टॉप बॉक्स बसवण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरू आहे. यामुळे डीटीएच अर्थात ‘डायरेक्ट टू होम’ बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विस्तार होऊन ती सध्याच्या 1.65 अब्ज डॉलरवरून 2020 पर्यंत पाच पटींनी वाढून 5.3 अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घरातल्या आपल्या नेहमीच्या केबलवाल्याची जागा 31 मार्चनंतर सेट टॉप बॉक्स घेणार आहे. त्यासाठी या तारखेपर्यंत केबल टीव्हीचे डिजिटलीकरण करणे बंधनकारक केले आहे. या डिजिटलीकरणाचा फायदा डीटीएच क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर होणार असून प्रतिवापरकर्त्यामागे डीटीएचमधून मिळणा-या एकूण सरासरी महसुलाचा आलेख वाढत आहे. 2012 मध्ये प्रतिमहिना 3.9 अब्ज डॉलर असलेला हा महसूल 2016 पर्यंत 5.2 अब्ज डॉलर आणि 2020 पर्यंत तो आणखी वाढून 6.0 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज हॉँगकॉँग येथील मीडिया पार्टनर्स एशिया या प्रसारमाध्यम, संपर्क आणि मनोरंजन उद्योगात कार्यरत असलेल्या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवठादार कंपनीने व्यक्त केला आहे. डीटीएच ग्राहकांची संख्या गेल्या वर्षातल्या 32.4 दशलक्षवरून 2017 पर्यंत 63.8 दशलक्ष, तर 2020 पर्यंत ती 76.6 दशलक्ष डॉलरवर जाण्याचा अंदाज या कंपनीने व्यक्त केला आहे.


* गेल्या वर्षात चार अव्वल भारतीय डीटीएच कंपन्यांचा बाजारहिस्सा : 88 टक्के
* डिश टीव्ही : 27 %
* टाटा स्काय : 19 %
* एअरटेल डिजिटल टीव्ही : 19 टक्के