मोबाईल प्रेमींसाठी सॅमसंगचा / मोबाईल प्रेमींसाठी सॅमसंगचा 'ड्युल' धमाका

बिझनेस ब्‍युरो

Apr 10,2012 11:50:24 AM IST

मोबाईल क्षेत्रात क्रांती करणा-या सॅमसंग कंपनीने एका नवा मोबाईल लॉन्‍च केला आहे. या नव्‍या w-999 मॉडेलमध्‍ये सर्वच गोष्‍टी डबल असतील. म्‍हणजे ड्युल सिम, ड्युल प्रोसेसर, ड्युल कॅमेरा आणि ड्युल टचस्‍क्रीन. ड्युल टचस्‍क्रीन ऐकल्‍यानंतर तुम्‍ही आश्‍चर्यचकीत झाला असाल पण खरच या मोबाईलमध्‍ये दोन स्‍क्रीन आहेत. मोबाईलची दुसरी स्‍क्रीन ही अल्‍फान्‍युमरिक की-बोर्ड बरोबर दिसून येते. या वैशिष्‍टयांबरोबर इतर अनेक खास गोष्‍टी या मोबाईलमध्‍ये उपलब्‍ध आहेत.
या मोबाईलमध्‍ये जीएसएम आणि सीडीएमए अशा दोन्‍ही प्रकारचे सिमकार्ड वापरता येते. हा मोबाईल खास चिनी ग्राहकांना समोर ठेवूनच तयार केला आहे. भारतात हा मोबाईल अजून उपलब्‍ध नाही. परंतु, कंपनीकडून भारतातही लवकरच हे मॉडेल लॉन्‍च केले जाईल.
या मोबाईलमध्‍ये 1.2 गीगाहर्ट्जचे प्रोसेसर, पाच मेगापिक्‍सलचा कॅमेरा, 16 जीबीची इंटरनल मेमरी जी 32 जीबी पर्यंत वाढवता येते. हा मोबाईल जर भारतात लॉन्‍च करण्‍यात आला तर त्‍याची किंमत जवळपास 30 हजार रूपये इतकी असेल.X
COMMENT