आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Diseal Price Hiking Inflation May Be Increase

डिझेलच्या दरवाढीमुळे उडणार महागाईचा भडका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तेल कंपन्यांना डिझेल विक्रीतून होणारा तोटा थोपवण्यासाठी केंद्र सरकारने डिझेलच्या किमती अंशत: नियंत्रणमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी मध्यरात्रीपासून डिझेलच्या किमती लिटरमागे 45 पैशांनी वाढल्या आहेत; परंतु किमती वाढीमुळे महागाईमध्ये आणखी 1.2 टक्क्यांची भर (120 बेसिस पॉइंट) पडून ती मार्चच्या तिमाहीत सात ते साडेसात टक्क्यांवर जाण्याची शक्यता बॅँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचचे अर्थतज्ज्ञ इंद्रनील सेनगुप्ता यांनी आपल्या अहवालात व्यक्त केली आहे.

आर्थिक सुधारणा राबवण्याचे पुढचे धाडसी पाऊल टाकताना केंद्र सरकारने गुरुवारी डिझेल नियंत्रणमुक्त करतानाच त्याच्या दरात लिटरमागे 51 पैशांनी वाढ केली. डिझेलवरील अनुदानाचा भार कमी करण्यासाठी प्रत्येक महिन्याला त्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बॅँक ऑ फ अमेरिका मेरिल लिंचच्या अहवालात मार्च
तिमाहीपर्यंत महागाई 7 टक्क्यांच्या आसपास राहून त्यानंतर चालू वर्षाच्या दुस-या सहामाहीत महागाईचा दर पुन्हा साडेसात ते आठ टक्क्यांवर जाईल. पुढील वर्षाच्या मार्चमध्ये महागाई साडेसहा ते सात टक्क्यांवर येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

केंद्र सरकारची डिझेलच्या किमती वाढवण्याची क्षमता, कच्च्या तेलाच्या किमती आणि पाऊस या पुन्हा तीन गोष्टी महागाईवर कोणता परिणाम करतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल, असे या अहवालात म्हटले आहे. आरबीआयचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी महागाई कमी झालेली असली तरी अद्याप चढ्या पातळीवर असल्याचे सांगून एक प्रकारे व्याजदर कमी न होण्याचेच संकेत दिले आहेत.