आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय चिंतेने सेन्सेक्सची होळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘सायप्रस’ला मिळालेल्या आर्थिक साहाय्यामुळे जागतिक शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे सकाळच्या सत्रात 215 अंकांनी उसळेल्या सेन्सेक्सला देशातील राजकीय चिंतेचे गालबोट लागले.

परिणामी दुपारच्या सत्रात झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 54 अंकांनी घसरून 18,681.42 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आपटी घेणारा सेन्सेक्स सलग
सातव्या सत्रात घसरला.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने 158 अंकांची उसळी घेतली होती. आर्थिक पेचप्रसंगाच्या विळख्यात अडकलेल्या सायप्रसला आर्थिक मदत देण्याचा निर्णय युरोपतील कर्जदारांनी अगदी अखेरच्या क्षणाला घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक शेअर बाजारात खरेदीचे वारे संचारले.

परिणामी खरेदीच्या पाठबळावर सेन्सेक्स 19,950.22 अंकांच्या पातळीवर जाऊन पोहोचला; परंतु द्रमुकपाठोपाठ आता समाजवादी पक्षदेखील सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होऊन राजकीय स्थैर्यतेच्या चिंतेने बाजाराला ग्रासून टाकले. त्यातून झालेल्या विक्रीच्या मा-यात भांडवली वस्तू, वाहन , धातू आणि बॅँक समभागांना फटका बसला.

बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 54.18 अंकांनी घसरून 18,681.42 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या सात सत्रात सेन्सेक्स जवळपास 890 अंकांनी गडगडला आहे. निफ्टीदेखील 17.50 अंकांनी घसरून 5633.85 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ओएनजीसी, एनटीपीसी, एचडीएफसी या समभागांना सर्वाधिक फटका बसला. गेल्या सात सत्रांपासून बाजारात घसरणीचा कल दिसून येत आहे.

टॉप लुझर्स
हीरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, एल अँड टी, भारती एअरटेल, गेल इंडिया, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, विप्रो, स्टेट बँक. बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा.