आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मंगळवारी तिमाही पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात सर्वांचा सावध पवित्रा दिसून आला. दिवसभरात अनेक चढ-उतार अनुभवणारा सेन्सेक्स सत्राच्या अखेरीस 0.18 अशा किरकोळ घसरणीनंतर 20,203.35 या पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 0.15 अंकांची भर पडून निर्देशांक 6074.80 अंकांवर बंद झाला.
आरबीआयच्या पतधोरण आढाव्याकडे सर्वांचे लक्ष असून त्याचे पडसाद सोमवारी बाजारात उमटले. त्यामुळे सत्रात अस्थिरता अधिक प्रमाणात दिसून आल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ विश्लेषक निधी सारस्वत यांनी व्यक्त केले. रिअॅल्टी, ऑटो, बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांना चांगली मागणी होती, तर रिफायनरी, ग्राहकोपयोगी वस्तू आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, हिंदाल्को, स्टर्लाइट इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग चमकले. ओएनजीसी,रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी आणि एसबीआय यांना विक्रीचा फटका बसला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.