आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Rupee Recovery Petrol Price Come Down, Moiley's Clear Signal

रूपयातील सुधारणांमुळे पेट्रोल लवकरच स्वस्त होणार, पेट्रोलियम मंत्री मोईलींचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया ब-यापैकी सावरला असल्याने येत्या काही दिवसांत पेट्रोलच्या दरांत कपात होण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी शुक्रवारी दिले. 30 सप्टेंबरला दरकपातीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. मोईली म्हणाले की, आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे घसरलेले दर व रुपयातील मजबुतीचा फायदा ग्राहकांना करून दिला जाईल.

गेल्या पाच महिन्यांत व्हॅट व इतर कर वगळता पेट्रोल प्रतिलिटर 10.80 रुपयांनी महागले आहे. दरम्यान, इंधन बचतीसाठी मोईली 9 ऑक्टोबरपासून दर बुधवारी सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणार आहेत.पेट्रोलियम मंत्रालय व सार्वजनिक तेल कंपन्यांचे अधिकारीही दर बुधवारी बसने प्रवास करणार आहेत.