आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदीच्या दागिने निर्यातदारांना ‘ड्यूटी ड्रॉबॅक’चा झटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारने सोन्याचे दागिने निर्यातदारांना एकीकडे ड्यूटी ड्रॉबॅक (कर परतीचे शुल्क) वाढवून दिलासा दिला असताना चांदी दागिने निर्यातदारांना मात्र याबाबत झटका दिला आहे. चांदीच्या दागिन्यांवर मिळणा-या ड्यूटी ड्रॉबॅकच्या प्रमाणात 31 टक्के कपात केली आहे.


केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाने (सीबीईसी) नुकतीच या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार .999 शुद्ध चांदीच्या दागिन्यांवर किलोमागे निर्यातदारांना आता 1795.50 रुपये ड्यूटी ड्रॉबॅक मिळेल. आधीच्या तुलनेत हे प्रमाण 31 टक्क्यांनी कमी आहे. कर परतीच्या वेळी संबंधित फर्म सेनव्हॅट सुविधेचा लाभ घेते की नाही हेही पाहण्यात येणार नाही. हा निर्णय तत्काळ लागू झाला आहे. या पूर्वी निर्यातदारांना किलोमागे 2590.80 रुपयांचा ड्यूटी ड्रॉबॅक मिळायचा.


दरम्यान, सोन्याचे दागिने निर्यातीवरील ड्यूटी ड्रॉबॅकची रक्कम 20 जून रोजी वाढवण्यात आली. सोन्याच्या एक ग्रॅम दागिने निर्यातीवर पूर्वी 100.70 रुपये ड्यूटी ड्रॉबॅक मिळायचा यात वाढ होऊन आता ग्रॅममागे 173.70 रुपये मिळतात.
चांदी दागिन्यांवरील शुल्क वाढीबाबत सीबीईएसच्या अधिका-यांनी सांगितले, सध्या चांदीचे भाव खूप घसरले आहेत. ज्या वेळी 2590.80 रुपये कर परती शुल्क आकारले जायचे तेव्हा चांदी 65,000 ते 70,000 रुपये किलो होती. आता ही किंमत घसरून 45,000 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे ड्यूटी ड्रॉबॅक शुल्क वाढवणे योग्य आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती घसरत असताना त्यावरील शुल्क वाढवण्यात आले आहे. त्या बाबत अधिका-यांनी सांगितले, चालू खात्यातील तूट वाढत चालली आहे. तिला आळा बसावा म्हणून सोन्याच्या दागिन्यांवरील शुल्क वाढवले आहे. देशातून निर्यात होणा-या वस्तूमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण मोठे आहे.


शुल्क वाढ का ?
केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाच्या अधिका-याने सांगितले, चांदीच्या दागिने निर्यातीवर ज्या वेळी 2590.80 रुपये कर परती शुल्क आकारले जायचे तेव्हा चांदी 65,000 ते 70,000 रुपये किलो होती. आता ही किंमत घसरून 45,000 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे ड्यूटी ड्रॉबॅक शुल्क वाढवण्यात आले आहे.