आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • E Retailers Should Focus On Small Cities And Mobile Shopping

REPORT: ई-शॉपिंगची वाढली क्रेज, आगामी दोन वर्षांत दुप्पट होईल ऑनलाइन शॉपिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- येत्या दोन वर्षांत ऑनलाइन शॉपिंगमध्ये दुपटीने वाढ होणार आहे. छोट्या- मोठ्या शहरातून ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे एका अहवालाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

'बॉस्टन कंसल्टन्सी ग्रुप'च्या अहवालानुसार, सन 2016 मध्ये ऑनलाइन शॉपिंगमध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूण शॉपिंगमध्ये ऑनलाइनचा वाटा 2013 मध्ये 6 टक्के होता. अहवालानुसार, ट्रॅव्हल आणि टूरिझमशी संबंधित सेल्स ऑनलाइन प्लेटफॉर्मच्या माध्यमातून 25 टक्के वाढ झाली आहे.

छोट्या शहरातही वाढली क्रेज...
देशातील छोट्या शहरे तसेच ग्रामीण भागातही सध्या ऑनलाइन शॉपिंगची क्रेज वाढली आहे. देशात 34 टक्क्यांहून अधिक इंटरनेट यूजर्स छोट्या शहरातील आहेत. ग्रामीण भागात 25 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात.

मोबाइलवरही करू शकतात एक्सेस..
56 टक्के इंटरनेट यूजर्स शहरी भागातील असून ते 25 वयोगटातील आहेत. 45 टक्के लोक इंटरनेटसाठी मोबाइल डिव्हाइसचा वापर करतात. 'शॉपक्ल्यूज डॉट कॉम'चे को-फाउंडर आणि सीईओ संजय सेठी यांच्या मते, त्यांच्या वेबसाइटवर 30 टक्क्यांहून जास्त लोक छोट्या शहरातील आहेत. इंटरनेट एक्सेस करण्यासाठी ते आपला मोबाइलचा वापर करतात.

सन 2016 मध्ये अर्बन इंटरनेट यूजर्स भागीदारीत 47 टक्के होईल, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. 2013 मध्ये 28 टक्के ऑनलाइन शॉपिंग केली जात होती.

फक्त डिस्काउंट नाही तर सुविधाही...
फक्त डिस्काउंट मिळतो म्हणून बहुतांश लोक ऑनलाइन शॉपिंग करतात, असे म्हटले जात होते. मात्र, अधिक सुविधा, ब्रान्ड्स आणि क्वॉलिटीसाठी बहुतांश ग्राहक इंटरनेटच्या माध्यमातून शॉपिंग करतात, असे अहवालात सां‍गण्यात आले आहे.

सर्वाधिक ऑनलाइन शॉपिंग एअरलाइन क्षेत्रात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुतांश प्रवाशी एअरलाइन्सची तिकिटे खरेदी करतात. यानंतर लोक मोबाइल आणि पीसी खरेदी करण्‍यासाठी इंटरनेटवर येतात. खरेदी करण्‍यापूर्वी 32 टक्के लोक संबंधित प्रॉडक्टबाबत माहिती सर्च करताना दिसतात.