आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-रिटर्नला सुलभ आधार, टॅक्सस्माइलच्या सुविधेला आयकर विभागाची मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वार्षिक करदात्यांना करविषयक विविध सेवा ऑनलाइन पुरवणार्‍या टॅक्सस्माइल या संकेतस्थळाची सेवा येथे मंगळवारी सादर करण्यात आली. टॅक्सस्माइल ही ई-मुद्रा समूहाचा हिस्सा असून ई-रिटर्न भरण्याच्या या सुविधेला आयकर विभागाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती ई-मुद्राच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कलाईवनी चित्तरंजन यांनी येथे दिली.

राज्यात सुमारे 42.5 लाख करदाते आहेत. ते वार्षिक कर भरतात. मात्र आयकर रिटर्न तयार करणे करदात्यांसाठी कठीण प्रक्रिया असते आणि त्यातील लहानशी चूकही दंडाला कारण ठरते. चुकीचे पॅन क्रमांक, आयकर आकारणी रक्कम चुकणे, अर्ज अपूर्ण भरणे, उशीर होणे अशा अनेक कारणांनी करदाते त्रस्त असतात. नुकतीच आयकर विभागाने पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्‍यांना रिटर्न भरणे बंधनकारक केले आहे. सोप्या ई-फायलिंगचा पर्याय टॅक्सस्माइल दिला आहे.

अल्पावधीत भरणा

करमोजणी, ई-रिटर्न भरणा, डिजिटल स्वाक्षरीचा वापर हे सारे अल्पावधीत आणि जलद गतीने करणे टॅक्सस्माइलच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.
कलाईवनी चित्तरंजन, व्यवस्थापकीय संचालक, ई-मुद्रा