आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • E Return Income Tax Filing Digital Signature Latest News

इलेक्ट्रॉनिक रिटर्नसाठी प्राप्तीकर विभागाला द्यावी लागणार आता डिजिटल स्वाक्षरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ई रिटर्न अर्थात इलेक्ट्रॉनिक रिटर्न भरण्यासाठी करदात्यााला ओळख म्हणून प्राप्तीकर विभागाला डिजिटल स्वाक्षरी द्यावी लागणार आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक रिटर्न भरल्यानंतर त्याची प्रत पोस्टाने पाठविण्याची गरज पडणार नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने(सीबीडीटी) या नव्या व्‍यवस्‍थेबाबत मार्च 2015 पासून अंमलबजावणी करण्‍याचाही निर्णय घेतला आहे.

सीबीडीटी ई-रिटर्नसाठी (आयटीआर 5) नवी व्यवस्था सुरु करण्यापूर्वी कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाणार आहे. यासाठी कायदा मंत्रालयाशी संपर्क करण्‍यात येईल. याशिवाय मार्च 2015 पर्यंत टीडीएस दस्तएवेजही ई-फायलिंग करण्‍याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या करदाता डिजिटल स्वाक्षरीचा वापर इलेक्ट्रॉनिक रिटर्न भरण्‍यासाठी करतात.

करदात्यांद्वारा इलेक्ट्रॉनिक अथवा डिजिटल स्वाक्षरी प्राप्त करण्याची पद्धत कशी असेल, यासाठी करदात्यांना अतिरिक्त खर्चाचा भार पडेल किंवा नाही. याबाबत अद्याप ‍निर्णय झालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय आहे डिजिटल स्वाक्षरी, वाचा पुढील स्लाइडवर...