आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Earn Money By Selling Your Antique Articles On Olx

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आवडी-निवडी जोपासून OLXवर करू शकता चांगली कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- आवड एक अशी गोष्ट आहे, ज्याच्या खर्चाचा हिशोब जोडता येऊ शकत नाही. परंतु तुम्ही आता आपल्या आवडी निवडी जोपासून त्यासोबतच कमाईसुध्दा करू शकता. अनेकांना दुर्मिळ आणि प्राचीन वस्तू जपून ठेवण्याची किंवा जमा करण्याची आवड असते. तसे पाहता, या वस्तू आपल्या जवळच्या आणि आवडत्या असतात आणि त्या विकायच्या म्हटल्या तर तसे ग्राहक शोधणेसुध्दा कठिण असतात.
परंतु आता अशा शौकीन लोकांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही अशा वस्तू विकून चांगली रक्कम मिळवू शकता. कारण या प्लॅटफॉर्मवर हजारो ग्राहक उपलब्ध आहेत. अनेक ग्राहकांना या वस्तूंची प्रतिक्षा असते आणि ते तुमच्या वस्तू घेण्यासाठी एका पायावर तयार असतात. या प्लॅटफॉर्मचे नाव आहे...OLX...
तुम्ही जूने वर्मानपत्रे, शिक्के, पोस्टल स्टँप, ग्रामोफोन आणि इतर अँटीक वस्तू OLXवर विकू शकता. यामध्ये तुमच्यामध्ये जर एखादी दुर्मिळ वस्तू असेल तर ग्राहक तुम्हाला तुम्ही म्हणाल तेवढी किंमत देऊ शकतात.
अनेकदा असे होते, की तुमच्या घरात अशा वस्तू धूळ खात पडलेल्या असतात, मात्र त्याची तुम्हाला माहितीच नसते. परंतु तुम्हाला अंदाजा नसेल, या वस्तूंपासून तुम्हाला हजारोंची कमाई होऊ शकते. तुम्हाला अशा शोधायच्या आणि त्यांचा फोटो OLXवर अपलोड करायचा आहे. हा फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाहीये.
तुमची जाहिरात एकदा पोस्ट झाली, की ग्राहक तुम्हाला संपर्क साधतील आणि डिल करतील. अगदी अहमदाबादच्या जॅमिसप्रमाणे. जॅमिस यांनी स्वत:कडे ठेवलेले 100 वर्षे जूने शिक्के आणि ग्रामोफोन विकून हजारो रुपये कमावले. त्यांना पैशांची गरज होती आणि त्यांनी जूने शिक्के आणि ग्रामोफोनचा फोटो अपलोड करून पैसे कमावले. जॅमिस यांना अनेक ग्राहकांनी संपर्क साधला. ज्या ग्राहकांनी त्यांना चांगली रक्कम दिली ती वस्तू त्या ग्राहकाची झाली.