आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट कार्डद्वारे असे कमवा जास्त रिवॉर्ड पॉइंट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रचिताला आपल्या वडिलांसाठी एक स्मार्टफोन घ्यायचा आहे. सर्वात स्वस्त स्मार्टफोन साधारणत: 7,500 रुपयांना येतो. स्मार्टफोन खरेदीसाठी रचिता आपल्या क्रेडिट कार्डवर मिळालेल्या पॉइंटची विक्री (रिडीम) करण्याचा निर्णय घेते. गेल्या दोन वर्षांत तिच्या क्रेडिट कार्डवर हे पॉइंट्स जमा आहेत. शक्य असेल तेवढी खरेदी ती क्रेडिट कार्डद्वारेच करते.


अधिक खर्चापोटी ग्राहकांना क्रेडिट कार्ड कंपन्या प्रोत्साहनपर काही बक्षिसी (रिवॉर्ड) देतात. डिस्काउंट, कॅश बॅक आणि रिवॉर्ड पाइंट्सच्या स्वरूपात ही बक्षिसी असते. खरेदीच्या वेळी हे रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करून रोख रकमेवर सूट मिळवता येते.


० असे मिळवा जास्तीचे पॉइंट्स : दर खरेदीच्या वेळी कार्ड स्वाइप झाल्यानंतर कंपनीकडून कार्डधारकाला रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. खर्च केलेल्या 40 ते 100 रुपयांमागे एक पॉइंट मिळवता येतो. कंपनीनिहाय याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. को-ब्रँडिंगवरही मिळणा-या पॉइंट्सची संख्या अवलंबून असते. समजा कार्ड कंपनीचे एखादा मॉल किंवा कंपनीशी, रिटेलर्सशी टायअप असेल तर त्यांच्याकडून केलेल्या खरेदीसाठी जास्त पॉइंट्स मिळू शकतात. महागड्या खरेदीच्या वेळी रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करणे योग्य ठरते.


० या बाबी लक्षात घ्या : पॉइंट्स रिडीम करण्यासंबंधी प्रत्येक बँक, कंपनीचे नियम व अटी वेगवेगळ्या असू शकतात. कार्डधारकांना आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही बँका, कंपनीच्या नियमानुसार पॉइंट्स रिडीम करण्यासाठी विशिष्ट तारीख, दिवस दिला जातो. पॉइंट्सच्या एक्स्पायरीपूर्वी ते रिडीम करणे आवश्यक असते. बहुतेक बँकांनी ही पद्धत आता बंद केली आहे. यासाठी कार्ड घेतेवेळी याकडे लक्ष द्या.


० पॉइंट्स असे रिडीम करा : या संदर्भातील माहिती संबंधित बँक, कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. पॉइंट्स रिडीम करण्याच्या काही पद्धती खाली दिल्या आहेत - कार्ड कंपनीकडून निर्धारित स्टोअर्समधून कपडे, पादत्राणे, दागिने, मोबाइल व इतर गॅजेट्स यासारख्या घरगुती खरेदीवर- एचडीएफसी बँक रिवॉर्ड पॉइंटला जेट एअरवेजमधून प्रवास करताना एअर माइल्समध्ये रूपांतरित करण्याची ऑफर देते. को-ब्रँडेड कंपन्यांकडून खरेदीवर बँक ऑफ बडोदासारख्या काही बँका रिवॉर्ड पॉइंट्सच्या बदल्यात कॅश देतात. कार्डच्या पुढील बिलात रिवॉर्ड पॉइंट्स मिसळले जाऊ शकतात. काही बँका रिवॉर्ड पॉइंट्सबरोबर कुपन देतात. कार्ड कंपनीच्या वेबसाइटवर नमूद उत्पादनाच्या ऑनलाइन खरेदीवर काही बँका को-ब्रँडेड स्टोअर्समधून गिफ्ट व्हाऊचरद्वारे रिवॉर्ड पॉइंट्स रिडीमची ऑफर देतात.


० असा करा योग्य वापर : काही बँका रिवॉर्ड पॉइंट्सच्या बदल्यात रोख रक्कम देतात. समजा कार्डद्वारे मोठी खरेदी करायची नसेल तर या सुविधेचा लाभ घेता येतो. कार्डचे टायअप असणा-या एअरलाइन्स किंवा तिकीट एजन्सीकडून खरेदी करून रिवॉर्ड पॉइंट्स मिळवता येतात तसेच ते रिडीम करून सूटही मिळवता येते. किराणा बिल भरण्यासाठी व्हाऊचर्सचा वापर करता येतो. वाढदिवस, सण-समारंभावेळी गिफ्ट व्हाऊचर्सद्वारे पॉइंट्स रिडीम करता येतात.
क्रेडिट कार्डाचा वापर समजदारपणे करावा. केवळ रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात म्हणून कार्डावर भारंभार खरेदी करणे टाळावे. जे कार्ड जास्त रिवॉर्ड पॉइंट्स, कॅश बॅक आणि इतर लाभ देते असेच कार्ड खरेदी करावे. यासाठी विविध क्रेडिट कार्डांचे रिवॉर्ड पॉइंट्स देण्याची पद्धत, त्यांचे दुकानदार व ब्रँड टाय-अप्स यांचा तुलनात्मक अभ्यास करून कार्ड खरेदी करावे.


लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.