आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अवलियाने दाखवले आपल्याला छायाचित्राचे जग; जाणून घ्या, कोडॅकच्या जन्मदात्याचा प्रवास...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकेत नोकरी करणारे जॉर्ज ईस्टमॅन यांनी २४ व्या वर्षी सेंटो डोमिंगो येथे जाण्याचा प्लॅन केला. मित्राने छायाचित्रे काढण्यासाठी कॅमेराही सोबत नेण्याचा सल्ला दिला. ईस्टमॅन यांनी फोटोग्राफीसाठी आवश्यक सर्व साहित्य खरेदी केले, मात्र ते ट्रीपला गेलेच नाहीत. हे साहित्य एवढे जड आणि खर्चिक होते की, ईस्टमॅन यांनी फिरायला जाणे बाजूला ठेवून आधी सर्वसामान्यांना छायाचित्र घेता येतील, असे सोपे उपकरण तयार करायचे ठरवले.

१८५४ मध्ये न्यूयॉर्क येथील वॉटरव्हिलेमध्ये जन्मलेल्या ईस्टमॅन यांचे कुटुंब १८६० मध्ये रोशेस्टर येथे राहण्यासाठी आले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने ईस्टमॅन यांना हायस्कूलचे शिक्षण सोडावे लागले. त्यांनी ऑफिसबॉय म्हणून काम सुरू केले. नंतर बँकेत बुककीपर बनले, मात्र सेंटो डोमिंगोच्या ट्रीप प्लॅनने त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलले. त्यांनी बँकेतील नोकरी सोडली.

एप्रिल १८८० मध्ये ईस्टमॅन यांनी फोटोग्राफी कंपनीची सुरुवात केली. त्यानंतर तिचे नाव कोडॅक असे ठेवण्यात आले. १८८५ मध्ये विल्यम हॉल वॉकर यांच्यासोबत हातमिळवणी करून रोल होल्डर डिव्हाइस तयार केले. त्यामुळे कॅमेऱ्याचा आकार छोटा झाला आणि त्याची किंमती कमी झाली. १८८८ मध्ये त्यांनी पहिला ईझी टू यूझ कॅमेरा लाँच केला. ‘यू प्रेस द बटन, वि डू द रेस्ट’ या घोषवाक्याने कॅमेरा बाजारात उतरवला. त्यावेळी १०० छायाचित्र क्लिक केल्यानंतर ग्राहक तो कॅमेरा कंपनीकडे पाठवत होता आणि कंपनी रोल डेव्हलप करून त्यांना छायाचित्र पाठवत असे.

काही वर्षांनंतर कंपनीचे नाव बदलून ते ईस्टमॅन कोडक असे ठेवण्यात आले. १८८९ मध्ये ईस्टमॅन यांनी केमिस्ट बेनरी रेशेनबाक यांच्या मदतीने कॅमेऱ्यात सहजपणे टाकता येईल, अशी फिल्म तयार केली. ही फिल्म कॅमेऱ्यात सहजपणे टाकता येत होती. थॉमस एडीसन यांनीही मोशन पिक्चर कॅमेऱ्यात या फिल्मचा वापर केला होता. कोडॅक कंपनीच्या उत्पादनांची लोकप्रियता वाढत गेली. कंपनीला आता फोटोग्राफीची आवड असणारी लहान मुले आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करायचे होते. अशा ग्राहकांसाठी १९०० मध्ये एक डॉलरच्या किमतीत ब्राउनी कॅमेरा लाँच करण्यात आला. त्याची किंमत कमी होती, त्यामुळे व्यावसायिक फोटोग्राफी न करणारेदेखील हा कॅमेरा वापरू शकत होते. कंपनीने पहिल्या महायुद्धादरम्यान सैनिकांसाठीदेखील फोटोग्राफी इक्विपमेंट विकसित केले.

हळूहळू फोटोग्राफिक फिल्म प्रॉडक्ट्ससह डिजिटल प्रिंटिंग, ग्राफिक्स, पॅकेजिंग, कमर्शिअल फिल्म्स इत्यादी क्षेत्रातही कंपनीचा विस्तार झाला. १९७५ सालाच्या आसपास कंपनीसमोरील समस्या वाढत गेल्या. शेअर्स ढासळले, मार्केट शेअर कमी होऊ लागले, कर्मचाऱ्यांची कपात होऊ लागली. अखेर जानेवारी २०१२ मध्ये कंपनी दिवाळखोरीत निघाली. शेकडो पेटंट विकलेले. २०१३ मध्ये आर्थिक घडी बसवली. आता कंपनीचे मुख्य काम पर्सनलाइझ्ड आणि डिजिटल इमेजिंग क्षेत्रात केंद्रित झाले आहे.
संस्थापक: जॉर्ज ईस्टमॅन
मुख्यालय: रोशेस्टर, न्यूयॉर्क
स्थापना: 1888
पुढील स्लाईडवर पाहा, इस्टमन कोडॅकची इतर छायाचित्रे...