आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photoshop Tricks: आता तुम्हीही बदलू शकाल फोटोचे बॅकग्राऊंड, जाणून घ्या कसे..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
https://www.youtube.com/watch?v=WOLwJREVnrM(खाली सांगण्यात आलेल्या ट्रीकवरून बनवलेला फोटो)
गॅजेट डेस्क - फोटो एडिटींग करण्याची आवड तर अनेकांना असते. मात्र अनेकता लोक नकळत काही चुका करून बसतात. एका सुंदर फोटोला थोडे एडीट करून त्याला आकर्षक बनवल्या जाऊ शकते. फोटो एडिटिंग अॅप्सपासून ते ऑनलाईन फोटो एडिटींग वेबसाईटवर अनेक प्रकार उपलब्ध आहे. मात्र तरीही फोटोशॉप हे फोटो एडिटींगसाठी काही सर्वात चांगल्या पर्यायांपैकी एक असल्याचे अनेक फोटो एडिटींग तज्ज्ञ मानतात. जर फोटोशॉपबद्दल बोलायचे झाल्यास तर अनेक पध्दतींनी फोटोमध्ये वेगवेगळे इफेक्ट्स टाकले जाऊ शकतात. Divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे अशाच काही TRICKS बद्दल
कोणत्याही फोटोचे बॅकग्राऊंड बदलणे -
कोणत्याही फोटोचे बॅकग्राऊंड बदलण्यासाठी काही सोप्या स्टेप्सचा वापर करणे आवश्यक असते. यासाठी सर्वात पहिले फोटो सलेक्ट करून फोटोशॉपच्या मॅजिक वँड टूलचा वापर करणे आवश्यक आहे. मॅजिक वँड टूल हे टुलबारमध्ये सापडेल. या टुलच्या साह्याने बॅकग्राऊंडला असलेला नकोसा भाग काढून टाकता येतो. यानंतर कोणत्याही बॅकग्राऊंड (नवे बॅकग्राऊंड फोटोचा वापर करणे)ला नव्या फाईलमध्ये उघडावे.
यानंतर मुख्य फोटो (ज्यावर मॅजिक वँडचा वापर करण्यात आला आहे.)च्या मोकळ्या भागावर पुन्हा एकदा मॅजिक वँड टूलचा वापर करावा आणि 'Ctrl+X' (कट ऑप्शन) चा वापर करावा. आता मेन फोटोला ड्रॅग करून त्या फोटोवर आणावे. जेथे जेथे फोटोचे साईज बिघडले आहे तेथे रिफाईन टूलचा वापर करता येऊ शकतो.