आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ebay Invested 8.3 Billion Rupees In Snapdeal.Com

Ebay ने snapdeal.com मध्ये केली 8.3 अब्ज रुपयांची गुंतवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमेरिकन कंपनी 'Ebay'ने भारतीय कंपनी 'snapdeal.com'मध्ये तब्बल 133.77 मिलियन डॉलरची (जवळपास 8.3 अब्ज रुपये) गुंतणूक केली आहे. 2013 मध्येही Ebay ने स्नॅपडीलहॉटकॉममध्ये गुंतवणूक केली होती आणि भविष्यातही गुंतवणूक करणार असल्याचे Ebayचे उपाध्यक्ष आणि आशिया पॅसिफिकचे एमडी जे ली यांनी सांगितले. 'snapdeal'च्या रुपयात एक उत्कृष्ट बिझनेस पार्टनर मिळाला असल्याचेही जे. ली यावेळी
म्हणाले.

मागील वर्षी स्नैपडीलमध्ये ईबे, इंटेल कॅपिटल आणि नेक्सस वेंटर पार्टनर या गुंतवणूकदारांनी 50 मिलियन डॉलर (3.09 अब्ज रुपये) गुंतवणूक केली होती.

'Ebay'द्वारा करण्यात आलेली गुंतवणूक ही विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे 'snapdeal'चे को-फाउंडर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुनाल बहल यांनी सांगितले. कालारी कॅपिटल (Kalaari Capital), नेक्सस वेंचर पार्टनर्स (Nexus Venture Partners), बेसेमर वेंचर पार्टनर्स (Bessemer Venture Partners), इंटेल कॅपिटल (Intel Capital), सामा कॅपिटल (Saama Capital) आदी गुंतवणूकदारांनी यावेळी सहभाग घेतला होता.