आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Econam's Medicine Price In Affordable ; 50 Thousand Store Available In Maharashtra

‘इकोमॅक’ची माफक दरातील औषधे बाजारात ;महाराष्‍ट्रातल्या 50 हजार दुकानांत उपलब्ध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ब्रँडेड औषधांपेक्षा तब्बल 70 टक्के कमी, तर विपणनापोटी होणा-या खर्चात 40 टक्क्यांपर्यंतची बचत करणारी औषधे भारतीय बाजारपेठेत नव्याने उपलब्ध करण्यात आली आहेत. ‘इकोमॅक रेमिडीज’च्या माध्यमातून महाराष्‍ट्रातल्या 50 हजार दुकानांमधून ती थेट उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

जेनेरिक औषधांची चर्चा सुरू होण्यापूर्वी अस्तित्वात आलेल्या मॅक रेमिडिजच्या ‘इकोमॅक रेमिडिज’ या नव्या उपकंपनीमार्फत अत्यावश्यक अशी 100 औषधे माफक दरात उपलब्ध होत असल्याची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रतिलाल राका यांनी केली. ही औषधे ब्रँडेड औषधांपेक्षा 70 टक्के स्वस्त असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. अनेक कंपन्या त्यांच्या संशोधन व विकास, विपणन खर्च, मनुष्यबळावरील वेतन आदींचा हिस्सा औषधांच्या छापील किमतींद्वारे वसूल करतात असे नमूद करून जेनेरिकच मात्र ब्रँडेड औषधे इकोमॅकमार्फत उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही ही औषधे थेट दुकाने, निवडक डॉक्टर तसेच सोशल नेटर्वकिंग व्यासपीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट करताना राका यांनी या माध्यमातून देशात सध्या 40 ते 60 टक्के खर्च वाचवता येणार आहे. परिणामी औषध कंपन्यांच्या 20 टक्के नफ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.

इतर राज्यांत लवकरच उपलब्ध
कंपनी देशभरातील सहा-सात लाख किरकोळ दुकानांपैकी महाराष्‍ट्रात असलेल्या 50 हजार औषध दुकानांमधून महिनाभरात निवडक 100 औषधे उपलब्ध करत असल्याचेही ते म्हणाले. ही औषधे सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी ‘एएससीडीए लिमिटेड’ आणि ‘एआयओसीडी लिमिटेड’ या कंपन्यांबरोबर करार करण्यात आला आहे. कंपनी अत्यावश्यक स्वस्त औषधांची संख्या 300च्या वर नेणार असून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड तसेच पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही या उपक्रमाचा विस्तार करण्याचा कंपनीचा मानस आहे.

औषध बाजारपेठ : रु. 60,000 कोटी
10 % वार्षिक वाढ
7 लाख विक्री दुकाने