आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economic Growth At 7 Per Cent In The Next Couple Of Years

आगामी काळात विकासदर 7 टक्क्यांवर - रतन टाटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - आगामी काळात भारताचा विकासदर 7 टक्क्यांवर पोहोचेल, असे मत रतन टाटा यांनी व्यक्त केले. भारतीय अर्थव्यवस्थेवर असा विश्वास दर्शवत असतानाच विकासदर 8 टक्क्यांची पातळी ओलांडणे तूर्त शक्य नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. गेल्या काही महिन्यांत सरकारकडून उचलण्यात आलेल्या पावलांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. मात्र अजून खूप काही करणे बाकी आहे. महागाईशिवाय घोटाळे आणि अन्य प्रकरणांमुळे भारतीय विकासदराची गती मंदावली असल्याचे टाटा यांनी स्पष्ट केले.

टाटा म्हणाले, सध्याची स्थिती मंदीसदृश आहे. मात्र, देशातील वाढती मागणी पाहता आगामी काळात विकासदर 7 टक्क्यांवर पोहोचेल. सिंगापूर मॅनेजमेंट विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. ते म्हणाले, गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

हे करायला हवे...
निव्वळ उदार धोरणाला कवटाळून चालणार नाही. व्यावसायिक धोरण हवे.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी बरेच काही करावे लागणार आहे.