आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economic Times One Day Left To Snap Up Cheap Fares On SpiceJet

स्पाइस जेटकडून स्वस्त विमान वारीची ऑफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्पाइस जेटने पुन्हा एकदा देशांतर्गत प्रवासासाठी तिकीट दरात सवलत जाहीर केली आहे. बुधवार ते शुक्रवार या काळात सवलतीच्या तिकिटासाठी आरक्षण करता येणार आहे. येत्या 10 जून ते 10 ऑगस्ट या काळात प्रवास करणार्‍यांना याचा फायदा होणार आहे. देशातील सात ठिकाणी होणार्‍या विमान फेर्‍यांसाठी या सवलतीचे दर लागू आहेत.

स्पाइस जेटच्या ऑफरनुसार मुंबई, गोवा, पुणे, अहमदाबादसारख्या शहरांतून होणार्‍या विमान उड्डाणांसाठी ही ऑफर लागू आहे. यात सर्व करासह सर्वात कमी तिकीटदर 1850 रुपये ठेवण्यात आला आहे. इतर विमान वाहतूक कंपनीने अशा प्रकारची ऑफर जाहीर केली नसली तरी इंडिगो आणि गो एअर कंपन्यांनी आपल्या विमान तिकिटांत कपात केली आहे. त्यामुळे या कंपन्यांचे तिकीट दरही आता स्पाइस जेटच्या दराच्या आसपास आले आहेत.

अशा आहेत ऑफर : स्पाइस जेटच्या ऑफरनुसार 10 जूनपासून मुंबई ते दिल्ली प्रवास भाडे सर्व सवलत धरून 4,450 रुपये होईल. इंडिगो,स्पाइस जेट यांचे दर सारखेच आहेत. मात्र, ऑफर सुरू होण्यापूर्वीचा विचार केल्यास 9 जून रोजी मुंबई ते दिल्लीचे गो एअर कंपनीचे प्रवास भाडे 5,750 रुपये आहे, तर इंडिगो आणि स्पाइस जेट या दोन्ही कंपन्यांचे दर 6000 रुपये आहे. 10 ऑगस्ट रोजी सर्वात कमी तिकीट दर इंडिगोचे 2700 रुपये आहे.