आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economical Affair Ministers Group Green Signal Disinvestment In ITDC, STC

आयटीडीसी, एसटीसीच्या निर्गुंतवणुकीस आर्थिक व्यवहारावरील मंत्री गटाची मान्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीने आयटीडीसी आणि स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपन्यांमधील सरकारी भांडवलाची निर्गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे. या निर्गुंतवणुकीतून सरकारी खजिन्यात 30 कोटी रुपयांची भर पडण्यास मदत होणार आहे.

आयटीडीसीमधील पाच टक्के आणि एसटीसीमधील 1.02 टक्के भांडवल ऑफर फॉर सेल माध्यमातून विकण्यासाठी निर्गुंतवणूक खात्याने मंत्रिमंडळाकडे परवानगी मागितली होती. या दोन्ही कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीला मान्यता देण्यात आल्याचे आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीनंतर बोलताना सूत्रांनी सांगितले. आयटीडीसीच्या भांडवल विक्रीतून 23.58 कोटी रुपये आणि स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या भांडवल विक्रीतून 10 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे.