आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्था: सोने घ्याल तर कर्ज नाही, बँका घालत आहेत नवी अट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्ज किंवा उचल देण्यास परवानगी देताना बँका नवी अट घालत आहेत. रकमेचा वापर सोने खरेदीसाठी केला जाणार नसेल तरच रक्कम मंजूर केली जात आहे. रुपयाची घसरण होत असताना सोन्याच्या वाढत्या मागणीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. कर्जदारांनी वैयक्तिक कर्जाचा वापरही सोने खरेदीसाठी करू नये, अशी अटही बँका घालत आहेत. रिझर्व्ह बँकेने बँका व वित्तीय संस्थांना तसे निर्देश दिले आहेत, असे एका खासगी बँकेच्या अधिकार्‍याने सांगितले. बँकांतर्फे विक्री होणारे 50 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे नाणे घेण्यासाठी उचल मिळणार नाही. लोक रुपयांमध्ये सोने खरेदी करतात पण त्याची आयात करण्यासाठी डॉलर मोजावे लागतात. त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन होत आहे.


जूनमधील घसरणीनंतर जुलैमध्ये 47 टन सोने आयात करण्यात आले. जूनमध्ये हे प्रमाण 31 टन होते. एप्रिल ते जुलैदरम्यान सोन्याची आयात 87 टक्क्यांनी वाढून 383 टन झाली.


सरकार काय, देशही बंद करील. लोक कारमध्ये सकाळी पेट्रोल टाकणार नाहीत का? विचाराचे आश्चर्यच वाटते, असे भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी सांगितले.


आधी घसरण, नंतर उसळी
आश्चर्यच वाटते : भाजप
खबरदारी : रिझर्व्ह बँकेकडून बँका, वित्तीय संस्थांना निर्देश
उपाययोजना : 16 सप्टेंबरपासून इंधन संरक्षण मोहीम : मोईली