आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्य तेल तीन ते पाच रुपयांनी महागले, दिवाळीपर्यंत भाववाढ कायम राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सण उत्सवामुळे खाद्य तेलाची मागणी वाढली असून त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने किमतीत तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. गत आठवड्यात सोयाबीन तेल 70 रुपये लिटर प्रमाणे विक्री होत होते, ते आता 75 रुपये प्रतिलिटरप्रमाणे विक्री होत आहे.
सरकीचे तेल तीन रुपयांनी महागले असून शेंगदाणा 90 ते 95, करडी 105 ते 110 रुपये लिटरप्रमाणे विक्री होत आहे.
बाजारपेठेत सोयाबीन, सरकी, करडई, शेंगदाणा या गळिताच्या धान्याला जास्त मागणी आहे. मात्र, पुरवठा कमी होत असल्याने त्याचा तेल कारखान्यावर परिणाम होऊन तेलाचे उत्पादन कमी होत आहे. सणांमुळे तेलाला मागणी वाढली आहे. परिणामत: गत आठवड्यात 70 रुपये लिटरप्रमाणे विक्री होणारे सोयाबीन तेल खरेदीसाठी आता 75 रुपये मोजावे लागत आहे. औरंगाबादेत दररोज मुंबई, पुणे, धुळे, पाचोरा, जालना, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी ठिकाणांवरून टँकरने तेल विक्रीसाठी येते. त्यापैकी 350 ते 400 क्विंटल तेल विक्री होते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.

दिवाळीपर्यंत भाववाढ कायम
सणांमुळे तेलाला मागणी आहे. मात्र, आवक कमी असल्याने तेलाच्या किमतीत कृत्रिम भाववाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत ही भाववाढ कायम राहील. त्यानंतर तेलाच्या किमती पाच ते दहा रुपयांनी स्वस्त होईल. करडई तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जगन्नाथ बसैये, व्यवस्थापक, बसैये शुद्ध तेल भांडार,

सणात खिशाला भुर्दंड
ऐन सणात तेलाच्या किमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा भुर्दंड बसतो. किराणा व्यापारी तर पॅकिंग तेलाच्या किमतीत मोठा नफा मिळवतात. यामुळे ग्राहकांची मोठी लूट होते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
सोनू मुरमुडे, गृहिणी, एन-2