आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effort Need For Empowering Small, Medium Industry Sector T.K. Nair

लघु, मध्यम उद्योग क्षेत्राच्या सक्षमतेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक - टी. के. नायर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - औद्योगिक वृद्धी गाठायची असेल तर लघु व मध्यम उद्योग क्षेत्र (एसएमई) सक्षम असले पाहिजे. एसएमईच्या सक्षमतेसाठी बँका, मोठ्या कंपन्या आणि शासकीय अधिका-यांनी प्रयत्न करावेत, असे मत पंतप्रधानांचे सल्लागार टी. के. नायर यांनी व्यक्त केले. एसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास संघटनेच्या संयुक्त विद्यमाने देशातील लघु व मध्यम उद्योजकांसाठी आयोजित बिझनेस परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले.


या वेळी निर्यात, गुंतवणूक, भांडवली बाजार आणि नवे तंत्रज्ञान यासाठी एसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि यूके इंडिया बिझनेस परिषद यांच्यात सामंजस्य करार झाला. एसएमई चेंबरच्या वर्धापन दिनानिमित्त उद्योजक आणि कंपन्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. परिषदेला प्रगती कॅपफिनचे सीईओ रमेशकुमार, कॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक व्ही. एस. कृष्णकुमार, बँक ऑफ इंडियाच्या एमडी व्ही. आर. अय्यर, यूके इंडिया बिझनेस परिषदेचे सीईओ रिचर्ड हिल्ड, एसएमई चेंबरचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, एल अँड टीचे सीईओ के. व्यंकटरामन, कॉर्पोरेशन बँकेचे एमडी अजयकुमार, दोहा बँकेचे सीईओ डॉ. आर सीतारामन आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट महामंडळाचे सीईओ दिलीप चेनॉय आदींची उपस्थिती होती.