आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eicma 2013 World\'s Biggest International Motorcycle Exhibition

इटलीत भरलाय जगप्रसिद्ध टू व्हीलर मेळावा; सादर झाल्या युवापीढीला लुभावणार्‍या BIKES!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटलीमधील मिलान शहरात जगप्रसिद्ध बाईक मेळावा भरला आहे. 71 व्या इआयसीएमए आंतरराष्‍ट्रीय मोटारसायकल प्रदर्शनीत जगभरातील 200 पेक्षा जास्त देशांनी सहभाग नोंदवला आहे. जगातील सगळ्यात मोठा बाईक मेळावाही समजला जातो. जगातील सुप्रसिद्ध टू व्हीलर कंपन्यांनी आपल्या बाईक्स मेळाव्यात सादर केल्या आहेत. चार दिवसांत या मेळाला कोट्यवधी लोकांनी भेट दिल्याचे समजते.

युवा पिढीची आवड लक्षात घेता यंदा आकर्षक डिझाइन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा बाईक्स सादर झाल्या आहेत. इआयसीएमएने 1914 साली या मेळाव्याला सुरुवात केली होती. तेव्हापासून जगातील सर्वश्रेष्ठ मोटरसायकल या प्रदर्शनीत सादर केल्या जाताहेत. यंदाही हायटेक टेक्नॉलॉजीच्या बाईक्सनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कावासाकी, यामाहा आणि केटीएम सारख्या प्रसिद्ध टू व्हीलर कंपन्यांनी आपले उत्पादन या मेळाव्यात सादर केले आहे. मेळाव्यात सादर करण्यात आलेल्या बाईक्स 2014 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

इटलीतील जगप्रसिद्ध मोटरसायकल प्रदर्शनीतील खास फोटोज् पाहाण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...