आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅनोसह ‘टाटा’च्या आठ कार नव्या रूपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिंचवड-पुणे - वाहन उद्योगात तीव्र झालेली स्पर्धा आणि मंदीच्या वातावरणात तग धरण्यासाठी सध्या सर्वच मोटार कंपन्यांची धडपड सुरू झाली आहे. विक्रीच्या झळांमधून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या टाटा मोटर्सनेदेखील सध्याच्या आव्हानात्मक वातावरणावर मात करण्यासाठी आपल्या तब्बल आठ विद्यमान वाहनांना नवा चेहरा देऊन ती पुन्हा बाजारात आणली आहेत. या नव्या वाहनांमुळे घसरलेल्या विक्रीत सुधारणा होण्याची आशा कंपनीने व्यक्त केली आहे.


वाहन उद्योगातील सध्याच्या मरगळीच्या वातावरणाचा टाटा मोटर्सला फटका बसला आहे. मार्च महिन्यात कंपनीच्या मोटारींची विक्री जवळपास 15 टक्क्यांनी घसरली. इतकेच नाही तर महिंद्रा अ‍ॅँड महिंद्राकडून स्पर्धा वाढल्यामुळे एसयूव्हीच्या विक्रीचीही झळ टाटा मोटर्सला बसली आहे. सर्वसामान्यांना परवडणारी नॅनो मोटार 2009 मध्ये बाजारात सर्वांच्याच कौतुकाचा आणि खरेदीचा विषय ठरली. नॅनोनेदेखील आर्थिक वर्षात विक्रीमध्ये 27 टक्क्यांची घट नोंदवली. या वर्षात केवळ 53, 848 नॅनो मोटारींची विक्री झाली. 2010 मध्ये आरिया नंतर कंपनीने एकही नवीन मोटार बाजारात आणलेली नाही. सध्याचे वातावरण फारच आव्हानात्मक असल्याचे टाटा मोटर्सचे एमडी कार्ल स्लिम यांनी मान्य केले.


या मंदीच्या वातावरणातही नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याचे धारिष्ट दाखवले आहे. ‘होरायझन नेक्स्ट’ हा नवा संदेश देत टाटा मोटर्सने ही विद्यमान उत्पादने नव्या रूपाने पुन्हा बाजारात सादर केली आहेत. या नवीन वाहनांमध्ये नॅनोबरोबरच इंडिका, सुमो या वाहनांचा समावेश आहे. या सर्व नवीन वाहनांची पाठवणी बुधवारपासून
सुरू होणार असून ती पुढच्या 90 दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे.