आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • El Nino News In Marathi, Financial Crises, Divya Marathi

‘अल निनो’ बिघडवणार आर्थिक वाढीचे गणित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेशातील काही हवामान संस्थांनी वातावरणातील अल निनो घटकाचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुढील वित्तीय वर्षात आर्थिक विकासदर सहा टक्क्यांच्या वर जाण्याचा अंदाज वर्तवला असला तरी अर्थव्यवस्थेतील मरगळीमुळे ही वाढ 5.2 टक्क्यांपर्यंतच होण्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.


परदेशातील काही आंतरराष्‍ट्रीय हवामान संस्थांनी यंदाच्या वर्षात वातावरणातील अल निनो घटकाचा परिणाम वाढण्याची शक्यता व्यक्त केली असल्याचे ‘क्रिसिल’ या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. मान्सूवर यंदाच्या वर्षात विपरीत परिणाम झाल्यास वित्तीय वर्ष 15 मध्ये विकासदरात 5.2 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असून सध्याच्या सहा टक्के अंदाजाच्या तुलनेत ती कमी असल्याचे ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. हा लवकर वर्तवलेला अंदाज आहे. यंदा अल निनोची परिस्थिती निर्माण होईल की नाही याबद्दल आता खूप अगोदर बोलल्यासारखे होईल, असेही अल निनोची परिस्थिती निर्माण झाली तरी भारतीय मान्सूनवर त्याचा परिणाम होईलच असे नाही. अल निनोमुळे भारतीय पावसाच्या पद्धतीवर परिणाम होऊन त्यामुळे आशियातील मान्सूनला विलंब होऊ शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे. सर्वसाधारण पाऊस झाल्यास कृषी क्षेत्रात तीन टक्के वाढ होते. त्यामुळे हा पाऊस सहा टक्के आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचा असल्याचे क्रिसिलने म्हटलेआहे. ऊर्जित पटेल समितीने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचे प्रमाण पुढील वर्षाच्या जानेवारीपर्यंत आठ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे सुचवले आहे. परंतु अन्नधान्य महागाईतील घसरण अशीच कायम राहिली तरच ते शक्य आहे असल्याचे क्रिसिलने म्हटले आहे.