आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत सल्लागार संस्थांची चांदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जाहिरात, सोशल मीडिया यांच्याकडून सध्याचा निवडणुकीचा हंगाम कॅश केला जातोय. दुसर्‍या बाजूला राजकीय पक्षांच्या प्रचार धोरणांचे व्यवस्थापन करणार्‍या सल्लागार संस्थांनाही निवडणुका फलदायी ठरणार आहेत. या निवडणुकांमधून सल्लागार कंपन्या 700 ते 800 कोटी रुपयांची कमाई करतील, असा अंदाज असोचेम या संस्थेने व्यक्त केला आहे.

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे एक नवे प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आपल्या प्रचार यंत्रणेला आकार देण्यासाठी तज्ज्ञ एजन्सीकडे आकृष्ट झाले आहेत.

मतांचा वाटा, विजयातील मतांचा फरक, भौगोलिक महत्त्व, मतदानाचे केंद्र स्थान आदी मतदानाची माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे नाकारताना असोचेमचे महासचिव डी. एस. रावत म्हणाले की, विजयी उमेदवाराला आपल्या विजयाचा ताबा कायम ठेवायचा असतो, तर हरणार्‍या उमेदवाराला भविष्यातील धोरणांच्या दृष्टीने त्याचे विश्लेषण महत्त्वाचे असते, असे मत व्यक्त केले. यंदा महानगरांसह दुय्यम शहरातही या संस्था सक्रिय असल्याचे दिसते.

सेवा कोणत्या
प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापन, प्रचार नियोजन, प्रचाराच्या मार्केटिंगचे धोरण, प्रचार डिझायनिंग, संकेतस्थळ आणि सोशल मीडिया पेजचे व्यवस्थापन, प्रतिस्पर्धी उमेदवाराचे बलाबल किती, मतदारांची अद्ययावत माहिती, मतदारांपर्यंत योग्य संदेश पोहोचवणे.

लहान शहरांमध्येही हाच कल
मुंबई, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता यांसारखी मोठी शहरेच नाही, तर द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्येही अशा प्रकारच्या सल्ला संस्थांची मदत घेण्याचा कल वाढतो आहे.