आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electric Bike News In Marathi, Motor Cylce, Divya Marathi

इलेक्ट्रिक बाइक, 9 सेकंदांत धावते 100 किमीच्या वेगाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत लोकांचे मत फारसे चांगले नाही. याचा खपही कमीच आहे. वेगाच्या बाबतीत तर जेमतेमच असतात. या वाहनांचा लूक बोअरिंग असतो. मंदगतीच्या असल्याने यावर चर्चाही नकारात्मक असते; परंतु टॉर्क मोटार सायकलच्या स्ट्रीट बेस्ड प्रोटोटाइप टॉर्क एफझेडने या धारणेला बदलले आहे.
* टॉर्क एफझेडची पीक पॉवर 40 बीएचपी आहे. याला झीरो आरपीएमवर पीक टॉर्क 6.11 किलो आहे. ही बाइक केवळ 9 सेकंदांत ताशी 120 किलोमीटर वेगाने धावते.
* पुण्याचे कपिल शेळके यांच्या टॉर्क मोटारसायकल्सने याची निर्मिती केली आहे. 2009 मध्ये ऑइल ऑफ मॅनने आयोजित केलेल्या टीटी झीरोच्या उद्घाटनपर रेसमध्ये ही तिस-या क्रमांकावर होती. 2010 ला ब्रिटनमध्ये आयोजित प्रथम इलेक्ट्रिक व्हेइकल चॅम्पियनशिपमध्ये ही बाइक उतरवण्यात आली होती.
* या बाइकची लोकप्रियता वाढवण्यासाठी डीसी मोटारशिवाय अन्य सर्व बॉडी पाटर्स यामाहा एफझेड-16 चे वापरण्यात आले आहेत. एफझेड फ्रेममध्ये ही इलेक्ट्रिक मोटार बसवण्यात आली आहे.
* पेट्रोल टँकच्या खाली मोठा ब्लॅक बॉक्स दिला गेला आहे, त्याने बॅटरी पॅकला खुबीने लपवण्यात आले आहे. बॅटरी पार्ट्सच्या संपर्कात कोणी येऊ नये यासाठी ही शक्कल लढवण्यात आली आहे.
* टॉर्क एफझेड ही बटण स्टार्ट बाइक आहे. मोटारचा कर्कश्श आवाज येत नाही. बाइक सुरू झाली आहे, हे केवळ डिजिटल डिस्प्लेने लक्षात येते. ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेग वाढवला तरच बाइकचा आवाज येतो.
* 150 सीसी मोटारसायकल्स प्रमाणेच याची गती वाढत जाते.
* व्हायब्रेशन्स, इंजिन नोट व एक्झॉस्ट टोन नसल्याने या बाइक राइडचा अनुभव पेट्रोल बाइकपेक्षा निराळा येतो.
* एकदा चार्ज केल्यावर ही बाइक 80 किलोमीटरपर्यंत चालते. रस्ता कसा आहे, ही यात महत्त्वाची बाब आहे.

- मोटारसायकलची पॉवर या स्टीकरवरून लक्षात येते.
- इलेक्ट्रिक पॉवर्ड बाइक असल्याने टॉर्क एफझेडला एक्झॉस्टची गरज नाही.
- चार्जर कंट्रोलरला व इतर इलेक्ट्रिक घटकांना लपवणे, यासाठीच केवळ टँकचा वापर करण्यात आला आहे.
- स्मार्टफोनप्रमाणेच पॉवर सॉकेटने याचे चार्जिंग केले जाते.
- डीसी मोटारला पॉवर देणारी बॅटरी या बॉक्समध्ये असते.
- याचा सर्वोच्च वेग ताशी 120 किलोमीटर आहे.