आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योग क्षेत्राचा होरा: मोदी सरकार देणार पवन, सौर ऊर्जेला गती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रत्येक घरात वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्रात नव्याने येणारे नरेंद्र मोदी यांचे सरकार नजीकच्या काळात पवन आणि सौर ऊर्जेवर जास्त भर देण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मोदी हे देशाचे पहिले ऊर्जा साक्षर पंतप्रधान ठरणार असून त्यांच्या प्रशासनामध्ये ऊर्जा क्षेत्रासाठी असलेल्या प्राधान्याने करण्यात येणार्‍या गोष्टींमध्ये स्वच्छ ऊर्जा निर्मितीला सर्वात जास्त महत्त्व असेल. रोजगार निर्मितीच्या मोठय़ा संधी आणि लाखो लोकांना करावयाचा वीजपुरवठा लक्षात घेता विशेषकरून पवन आणि सौर ऊर्जेवर ते लक्ष देतील, असे जाणकारांचे मत आहे. अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांमधील एकत्रित लोकसंख्येच्या तुलनेत देशातील जवळपास 400 दशलक्षांपेक्षा जास्त भारतीय विजेपासून वंचित आहेत. उद्योग क्षेत्रातील अधिकार्‍यांच्या मते नवे सरकार स्वतंत्र पवन ऊर्जा धोरण राबवण्याची शक्यता आहे. नवे सरकार पोषक वातावरण निर्माण करेल, अशी आशा असून अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय सुधारणा घडवून आणेल, असे मत सुझलॉन समूहाचे अध्यक्ष तुलसी तंती यांनी व्यक्त केले.