मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी रेपो दरात 0.25% टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार असून हप्त्याच्या रकमेमध्ये त्यामुळे कपात होणार आहे. या निर्णयावर लगेचच अंमलबजावणी केली जाणार आहे. दुसरीकडे, दुसरीकडे, रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम तत्काळ दिसून आला आहे.
या कपातीमुळे रिझर्व्ह बँकेचा मुख्य व्याजदर 8 टक्क्यांवरून 7.75 टक्क्यांवर येणार आहे. रिझर्व्ह बँकेने कपात लागू केल्यानंतर इतर बँकांही कर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात करण्याची शक्यता असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी म्हटले आहे.
जागतिक बाजारपेठांमध्ये तेलाच्या दरांमध्ये जून महिन्यापासून सतत घसरण होत आहे. सुमारे 60 टक्क्यांनी हे दर घसरले आहेत. त्यामुळे रेपो दरात अशा प्रकारे कपात होणे अपेक्षितच होते. जुलै 2014 पासून महागाईमुळे वाढणारा दबाव काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेणे सोपे जात असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढावा बैठकीच्या अवघ्या दोन आठवडा आधी रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे 3 फेब्रुवारीला होणा-या या बैठकीत आरबीआय कोणत्याही प्रकारची कपात करण्याच शक्यता नसल्याचे अर्थतज्ज्ञ जेपी मॉर्गन म्हणाले आहेत. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी बँक सरकारच्या अर्थसंकल्पाची वाट पाहू शकते असेही ते म्हणाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शेअर बाजाराचा सेन्सेक्स उसळला....