आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचार्‍यांचे आई-वडील मेडिक्लेमच्या कक्षेबाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वाढत्या खर्चाला फाटा देण्यासाठी अनेक कंपन्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये बदल करत आहेत. आतापर्यंत कंपन्यांकडून देण्यात येणा-या मेडिक्लेम सुविधेत पालकांचाही समावेश असायचा. मात्र, आता अनेक कंपन्या ही सुविधा देण्याचे टाळत असल्याचे निरीक्षण मार्शने केलेल्या एम्प्लॉइज हेल्थ अँड बेनिफिट्स अभ्यास अहवालात नोंदवले आहे. मुलांवर विसंबून असलेल्या पालकांसाठी ही दु:खद बातमी आहे. गेल्या सहा वर्षांपासून कंपन्यांच्या मेडिक्लेममध्ये कर्मचार्‍यांबरोबरच त्यांच्या पालकांचाही समावेश असायचा. आता कंपन्या पालकांना संरक्षण देण्यास कचरत आहेत.

सध्या मेडिक्लेम ग्रुप विमा संरक्षण देणाºया केवळ 36 कंपन्या आहेत. दुसरीकडे कंपन्यांतील ज्या कर्मचार्‍यांचे पालक आजारी आहेत त्यांच्यासाठी पैसे खर्च करण्यात विमा कंपन्यांसाठी नुकसानीचा व्यवहार ठरत आहे. मार्शच्या अभ्यासानुसार सध्या 36 टक्के संस्थाच आपल्या कर्मचार्‍यांच्या पालकांना मेडिक्लेम विमा संरक्षण देतात. गेल्या वर्षी कर्मचारी मेडिक्लेममधील पालकांच्या संरक्षणात 54 ते 65 टक्क्यांपर्यंत कपात झाली.