आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employee Who Went To Family Trip That Time They Saw Official Mail Found In New Research

RESEARCH: सहलीला गेल्‍यानंतरही कर्मचारी पाहतात कार्यालयीन मेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सहलीला गेलेले कर्मचारी मानसिक शांती मिळावी यासाठी कार्यालयीन कामाचे मेल पाहतात अशी रंजक बाब एका पाहणीत समोर आली आहे.
सहलविषयक सल्लासेवा देणारी कंपनी ट्रिपअडव्हायजर डॉट कॉम या संकेत स्थळाने ही पाहणी देशभरातील शहरात केली. याची माहिती भारताचे प्रमुख निखिल गंजू यांनी दिली.

पाहणी केलेल्या लोकांपैकी ७७ टक्के लोकांनी सहलीच्या काळात काम केले तरी पत्नीशी वाद होत नाही असे सांगितले आहे. ते म्हणाले की, ९० टक्क्याहून अधिक लोक सहलीवर असताना कामाचे कॉल घेतात आणि ग्राहकांना सेवा देतात. मुळात आपत्कालीन स्थिती उद्भवली तरच कंपनीशी संपर्क साधावा असे व्यवस्थापनाला अपेक्षित असते.

सेलफोनचा किती परिणाम झालेला आहे हे स्पष्ट करताना ते म्हणाले की ६२ टक्के लोक अशा कामासाठी स्मार्टफोन वापरतात. काम आणि विरंगुळा यांची सांगड घालण्याचे भारतीय लोकांचे कसब यातून स्पष्ट होते.