आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employees In India Can Expect 11% Pay Hike In 2014, Report

कर्मचाऱ्यांना 11 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता, पगाराला महागाईची झळ बसणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आगामी आर्थिक वर्षांत भारतातील कर्मचाऱ्यांना 11 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे, असे टॉवर्स वॅटसन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. मात्र महागाईचा निर्देशांक दोन डिजिटमध्ये राहण्याची शक्यता असल्याने वाढीव पगाराला महागाईची झळ बसणार असल्याचे दिसून येत आहे.
आगामी आर्थिक वर्षांत आशियायी देशातील कर्मचाऱ्यांना साधारणपणे 7 टक्के पगारवाढ मिळणार असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यात भारतातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक म्हणजे 11 टक्के पगारवाढ मिळणार असल्याचे दिसून येते. वाढत्या महागाईचा विचार केल्यास पगारवाढ केवळ 2 टक्के राहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
चलनवाढीचा विचार केल्यास चीन व व्हिएतनाम या देशांची 4.9 टक्के, जपानची 0.5 टक्के आणि भारताची 2 टक्के पगारवाढ राहण्याची शक्यता आहे.
गेल्या आर्थिक वर्षाप्रमाणेच राहणार पगारवाढ, वाचा पुढील स्लाईडवर