आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EMPLOYEES' PROVIDENT FUND ORGANIZATION News In Marathi

पीएफ दाव्यांचा निपटारा 20 दिवसांत करा; क्षेत्रीय अधिकार्‍यांना सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढून घेणे तसेच निवृत्तिवेतनाच्या दाव्यांचा निपटारा करण्यासाठी सध्या 30 दिवसांची मुदत आहे, परंतु कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या 120 पेक्षा जास्त क्षेत्रीय अधिकार्‍यांना दावा रकमेचा निपटारा 20 दिवसांच्या आत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

केंद्रीय भविष्य निर्वाह आयुक्त के. के. जालान यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कामगिरीचा अलीकडेच आढावा घेतला. त्यानंतर चालू आर्थिक वर्षासाठी सर्व दाव्यांचा निपटारा हा 20 दिवसांमध्ये करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

निवृत्तिवेतन निधी दाव्यांची प्रक्रिया जलद होण्याची गरज असल्याकडे जालान यांनी लक्ष वेधले. दावा निपटारा प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असल्यास त्याची लेखी नोंद करून त्यासंदर्भात अर्जदाराशी अर्ज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपर्क साधावा, असेही जालान यांनी म्हटले आहे.