आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employment Recruitment News In Marathi, Timesjobs Dot Com, Divya Marathi

नोकरभरतीत झाली 15 % वाढ, ‘टाइम्सजॉब डॉट कॉम’चा अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरसकट सर्व महत्त्वाच्या उद्योगांमध्ये नवीन नोक-यांचा पाऊस सुरू आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात नोकरभरतीचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढले असून त्यातही आरोग्य आणि पेट्रोरसायन या दोन क्षेत्रांमध्ये चांगल्या संधी मिळाल्या असल्याचे दिसून आले आहे.आरोग्य, पेट्रोरसायन, तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, बहुराष्‍ट्रीय कंपन्या, वाहन आणि वाहनांचे सुटे भाग या प्रमुख उद्योगांत नवीन नोक-यांचे प्रमाण जास्त असल्याचे ‘टाइम्सजॉब डॉट कॉम’ या संकेतस्थळाने म्हटले आहे.

इंटरनेट स्टार्टअप अर्थात नव्याने सुरू झालेल्या इंटरनेट कंपन्यांमधील नोक-यांचे प्रमाण एकाच महिन्यात 25 टक्क्यांनी वाढले आहे. त्यातूनही स्टार्टअप कंपन्यांमधील वरिष्ठ पदांच्या नोक-यांमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे. पारंपरिक नोक-यांचे प्रमाणही फारसे घसरलेले नाही. सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांतील व्यावसायिकांची मागणी जुलैमध्ये लक्षणीय वाढली आहे.
पाच ते वीस वर्षांचा अनुभव असलेल्या मध्यम पातळीवरील व्यावसायिकांनी या नवीन नोक-या पटकावण्यात आघाडी घेतली आहे. कंटेंट एडिटर, एन्टरटेनमेंट, जर्नालिझम क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणीदेखील 30 टक्क्यांनी वाढली आहे.

ई-कॉमर्समुळे सुगीचे दिवस
स्नॅपडील, फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्समधील बड्या कंपन्यांनी गेल्या महिन्यापासून नवीन नोक-यांची कवाडे उघडल्यामुळे ई-कॉमर्स, रिटेल सेवा, माध्यम आणि आदरातिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिकांना ख-या अर्थाने सुगीचे दिवस आले आहेत.