आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employment Situation Summary Bureau Of Labor Statistics

सहा महिन्यांत नोकर्‍यांत झाली वाढ, चार महत्त्वाच्या क्षेत्रांत रोजगाराच्या संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भांडवल बाजारातील स्थिती सुधारण्याबरोबरच व्यापार क्षेत्रातील स्थितीही मजबूत झाली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत देशातील दूरसंचार, विपणन, जाहिरात आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील नोकर्‍यांच्या संधीत वाढ झाली आहे.
उद्योग व वाणिज्य संघटना असोचेमच्या अहवालानुसार, केंद्रीय अर्थसंकल्पात गुंतवणूकवाढीस चालना देण्यासाठी टाकण्यात आलेली पावले, जसे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट स्थापन करणे आणि व्याजदरात कपात करण्याचे संकेत यामुळे निर्मिती क्षेत्रात रोजगाराच्या संधीत वाढ झाली आहे. अहवालानुसार, यंदाच्या पहिल्या सहामाहीत जानेवारी ते जून या काळात रोजगार संधींच्या बाबतीत, दिल्ली तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) दूरसंचार क्षेत्रात सर्वाधिक 54 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर बंगळुरू येथे 38 टक्के आणि हैदराबादेत 32 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर चेन्नईत 15 टक्के आणि मुंबईत दूरसंचार क्षेत्रातील रोजगार संधीत 28 टक्के घट झाली आहे.

क्षेत्रनिहाय रोजगार संधींची स्थिती, पुढील स्लाइडमध्ये