आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Engergy Drink News In Marathi, Divya Marathi, Bislarry International Private Limited

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात एनर्जी ड्रिंक प्रथमच पेट बाटलीमध्ये मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तरुणाईमध्ये सध्या एनर्जी ड्रिंकचे एक नवे फॅड आले आहे. अन्य देशांच्या तुलनेत देशातील एनर्जी ड्रिंक बाजारपेठ बाल्यावस्थेत असली तरी बिस्लरी इंटरनॅशनल प्रा. लि.च्या नव्या प्रवेशामुळे या उद्याेगाला तसेच ग्राहकांना देखील नवी झिंग मिळणार आहे ती ‘ऊर्जा’ या नव्या एनर्जी ड्रिंकमुळे. सध्या ‘ऊर्जा’ कॅनमध्ये उपलब्ध असलेली तरी पेट बाटलीमध्ये हे पेय लवकरच उपलब्ध करून देणारी िबस्लरी ही पहिली कंपनी ठरणार आहे.

थम्सअप, िलमका, गाेल्डस्पाॅट आणि माझा ब्रँडच्या माध्यमातून साॅफ्ट िड्रंक बाजारपेठेत आपले नाव काेरल्यानंतर िबस्लरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी ‘ऊर्जा’च्या माध्यमातून तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा कॉर्बोरेटेड सॉफ्ट िड्रंक्स बाजारात प्रवेश केला आहे. या प्रकल्पामध्ये कंपनीने २०० काेटी रुपयांची गंुंतवणूक केली आहे. येत्या वर्षभरात कंपनीने एक काेटी केसेसची (एक केस = २४ बाटल्या) िवक्री करणार आहे.

नवे आकर्षण
साधारणपणे एनर्जी ड्रिंक कॅनमध्येच उपलब्ध असते, परंतु एकदा हा कॅन उघडल्यानंतर ते पेय पूर्णपणे िपणे िकंवा उरल्यास फेकून द्यावे लागते, अशी ग्राहकांची तक्रार आहे. ही तक्रार लक्षात घेऊन चाैहान यांनी हे पेय पेट बाटलीतच देण्याचा िनर्णय घेतला. बाटलीतील पेय कधीही वापरता येऊ शकते. कॅफेनच्या वापराला तीव्र िवराेध असलेल्या चाैहान यांनी नव्या उत्पादनात बेरी फळांच्या जीवनसत्त्वांचा वापर केला आहे. बाटलीबंद पाणी नंतर बाटलीबंद स्फूर्तीपेय देखील िततकेच यश िमळवून देईल, असा िवश्वासही त्यांनी व्यक्त केला.