आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियांत्रिकी विद्यार्थ्‍यांची पसंती आयटीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सगळ्यात प्राधान्य असलेले क्षेत्र म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला ‘लाइक’ केले आहे. त्याचबरोबर नोकरी करण्यासाठी गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इन्फोसिस या तीन अव्वल पसंतीच्या कंपन्या असल्याचे ‘नेल्सन’च्या एका पाहणी अहवालात दिसून आले आहे.

नेल्सन कॅम्पस ट्रॅक टेक्नॉलॉजी स्कूलच्या 2012 च्या सर्वेक्षणानुसार यंदाच्या वर्षात अभियांत्रिकी विद्यार्थी वर्षाला 11 लाख रुपये पगाराची नोकरी अपेक्षित करीत आहेत. नोकरीला लागल्यानंतर सुरुवातीला सरासरी 9.3 लाख रुपये वेतन देण्यात येते. पण अगोदरच्या बॅचच्या तुलनेत या पगारात 20 टक्के वाढ त्यांना अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या जुलै ते ऑगस्ट या कालावधीत देशातील 73 तंत्रज्ञान महाविद्यालयांतील अडीच हजार विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून नेल्सनने हा अंदाज व्यक्त केला आहे.

वैयक्तिक तंत्रज्ञान क्षेत्रावर जास्त भर देण्यात येत असल्यामुळे देशातील आयटी क्षेत्राचा बहर कायम असून वेगवेगळ्या ‘स्पेशलायझेशन’मुळे या क्षेत्राला विद्यार्थ्यांची अद्यापही पसंती मिळत आहे. परंतु त्याच्याच जोडीला विद्युत आणि ऊर्जा यासारख्या काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येदेखील हे विद्यार्थी स्वारस्य दाखवत असल्याचे मत नेल्सन इंडियाचे कार्यकारी संचालक दिनेश कपूर यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी ज्या वेळी महाविद्यालयात प्रवेश घेतात त्याच वेळी त्यांचे लक्ष्य निश्चित झालेले असते. त्याचप्रमाणे आपले दीर्घकालीन लक्ष्य आणि करिअरबाबतदेखील ते जास्त सजग असतात. आज विविध पर्याय उपलब्ध झालेले असल्याने हे विद्यार्थी आपल्या अभ्यासक्रमाच्या सीमारेषेपलीकडे झेप घेण्याची त्यांची आकांक्षा असून त्या संधींचा शोध घेण्याची तयारी असते, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.

यंदाच्या बॅचमधील जवळपास अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांनी पुढच्या शिक्षणासाठी किंवा अन्य कोणते करिअर करण्यासाठी तीन वर्षांच्या आत पहिली नोकरी सोडण्याचा मानस व्यक्त केला असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या जुलै ते ऑगस्ट या कालावधीत देशातील 73 तंत्रज्ञान महाविद्यालयांतील अडीच हजार विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून नेल्सनने हा अंदाज व्यक्त केला आहे.

अन्य आवडती क्षेत्रे
* दूरसंचार : 18 %
* विद्युत : 18 %
* व्यवस्थापन
सल्ला 17 %
नोकरीसाठी या कंपन्यांना पसंती
* गुगल
* मायक्रोसॉफ्ट
* इन्फोसिस
* टीसीएस
* आयबीएम
* फेसबुक,
* भेल
* एल अ‍ॅँड टी,
* एनटीपीसी