शेव्हर्लेची नवी ‘एन्जॉय’ / शेव्हर्लेची नवी ‘एन्जॉय’ देणार प्रवासाचा आनंद

May 12,2013 07:49:00 AM IST

मुंबई- मारुती एट्रिगा, निस्सान इव्हालिया आणि टोयोटा इनोव्हा या बहुउद्देशीय वाहनांशी स्पर्धा करू शकेल अशी ‘शेव्हर्ले एन्जॉय’ ही नवीन एमपीव्ही जनरल मोटर्स इंडियाने वाहन बाजारात दाखल केली आहे. ‘एन्जॉय’मध्ये डिझेल आणि पेट्रोल इंजिन असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
इनोव्हा, महिंद्रा झायलो आणि इव्हालिया यांच्या तुलनेत ‘एन्जॉय’ एमपीव्ही काहीशी आकाराने लहान असली तरी ‘एट्रिगा’च्या तुलनेत मात्र मोठी आहे. मारुती एट्रिगाची किंमत 5.98 लाख व 8.7 लाख रुपयांदरम्यान असल्याने या नव्या एमपीव्हीची किंमत 5.49 लाख आणि 7.99 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे किमतीबाबतीत मात्र ग्राहकांना खरोखरच ‘एन्जॉय’ करता येणार आहे. भारतीय रस्त्यांना अनुकूल ठरेल अशा प्रकारे या वाहनाची रचना करण्यात आली असून किमतीचा विचार करता या नव्या वाहनाला चांगले यश मिळेल, असा विश्वास जीएम इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी लॉवेल पॅडॉक यांनी व्यक्त केला.

शेव्हर्ले एन्जॉयची वैशिष्ट्ये
० लांबी 4,305 मिमी, रुंदी 1,680 मिमी, उंची 1,750 मिमी
० चाकाचा आकार 2,720 मिमीचा असून मध्यम ते हाय-एंड सेदानला साजेसा
० हाय रूफ डिझाइनमुळे सर्व प्रवाशांना डोक्याच्या बाजूला पुरेशी जागा मिळते
० फ्लेक्सी-स्मार्टमुळे पाय पसरून बसण्यास ऐसपैस जागा
० मागे आणि पुढे गॅसने भरलेले शॉक अब्झॉर्बर्समुळे खडबडीत रस्त्यावरही आरामदायी अनुभव
० पुढील भागात दुहेरी एअर बॅग्स, रियर पार्क असिस्ट, रियर विंडो डिफॉगर, रियर वॉश
० वेल्वेट रेड, स्विचब्लेड सिल्व्हर, समिट व्हाइट, कॅव्हियार ब्लॅक, लिनेन बेज, सॅनड्रिफ्ट ग्रे
7 आणि 8 आसनी पर्याय : विशेष म्हणजे ‘शेव्हर्ले एन्जॉय’मध्ये सात आणि आठ आसने असे दोन पर्याय ग्राहकांना मिळणार आहेत.
अशी आहे किंमत
प्रकार किंमत लाखांत
(एक्स दिल्ली)
एलएस 8 आसनी पेट्रोल 5.49 रु.
एलएस 7 आसनी पेट्रोल 5.64 रु.
एलटी 7 आसनी पेट्रोल 6.31 रु.
एलटीझेड 7 आसनी पेट्रोल 6.99 रु.
एलएस 8 आसनी डिझेल 6.69 रु.
एलएस 7 आसनी डिझेल 6.75 रु.
एलटी 7 आसनी डिझेल 7.42 रु.
एलटीझेड 7 आसनी डिझेल 7.99 रु.

X