आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EPFO Members Will Soon Get Portable Account Number, News In Marathi

पीएफ खात्याला ऑक्टोबरपासून पोर्टेबिलिटी; 11.78 कोटी सदस्यांची होणार सोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांसाठी पोर्टेबल युनिव्हर्सल खाते क्रमांक (यूएएन) देण्याचे काम अभियानाच्या रूपात सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यानंतर हा क्रमांक आपला ग्राहक ओळख (नो युवर कस्टमर-केवायसी) आधार व पॅन कार्डद्वारे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे हे खाते अधिक सुरक्षित होईल.

ईपीएफओने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. त्यानुसार ईपीएफओने सर्व सदस्यांना यूएएन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी जे सदस्य सध्या या निधीत सक्रिय सहभागी आहेत

अशा सदस्यांना हा क्रमांक
देण्यात येणार आहे. यंदाच्या जूनअखेर ईपीएफओद्वारे संचालित सामाजिक सुरक्षा योजनांत 3.1 कोटी सदस्यांनी गुंतवणूक केली आहे. असे असले तरी 31 मार्च 2014 अखेर ईपीएफओचे 11.78 कोटी एकूण सदस्य आहेत. या योजनेअंतर्गत सदस्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत यूएएन देण्याची ईपीएफओची योजना आहे. ईपीएफओ सदस्यांसाठी या क्रमांकावर पोर्टेबिलिटीची सुविधा मिळणार आहे. म्हणजे नोकरी बदलल्यास सदस्याला आपले भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खाते बदलण्यासाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा पुरवण्याची सदस्यांची
जुनी मागणी आहे.