आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • EPFO Panel Skirts Proposal On 8.5% Interest On Deposits

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीएफवर मिळणार 8.50टक्के व्याज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) चालू आर्थिक वर्षातील (2012-13) भविष्य निर्वाह निधी गुंतवणुकीवर 8.50 टक्के व्याज देण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात या गुंतवणुकीवर 8.25 टक्के व्याज होते. संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या 25 फेब्रुवारी रोजी होणा-या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. यामुळे संघटनेच्या पाच कोटी कर्मचारी वर्गणीदारांना फायदा होईल.


सूत्रांनी सांगितले, चालू आर्थिक वर्षात भविष्य निधी गुंतवणुकीवर 8.50 टक्के व्याज देण्याचा ईपीएफओचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आर्थिक तूट पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रस्तावाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. ईपीएफओने 2010-11 या आर्थिक वर्षात भविष्य निधी गुंतवणुकीवर 9.5 टक्के व्याज दिले होते. गेल्या आर्थिक वर्षात मात्र कपात करून व्याज 8.25 टक्के करण्यात आले.