आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EPFO To Provide All Benefits Through Electronic Mode By September

सप्टेंबरपासून भविष्य निर्वाह निधी ऑनलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने यंदाच्या सप्टेंबरपासून आपल्या सर्व लाभार्थींना ऑनलाइन पद्धतीने त्यांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भविष्य निर्वाह निधी दाव्यांचादेखील समावेश आहे. सध्या स्टेट बँकेत खाते असलेल्या कर्मचार्‍यांनाच ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 31 ऑगस्टपासून ई-पेमेंटचा 100 टक्के लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेंतर्गत भविष्य निर्वाह निधीतून काढलेली रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत एका आर्थिक वर्षात भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून एक कोटीपेक्षा जास्त दाव्यांचा निपटारा करते.